29.1 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

आरएसएस मुख्यालयाजवळील संविधान चौकात आज एक महत्त्वपूर्ण आंदोलनाची सुरुवात.

आरएसएस मुख्यालयाजवळील संविधान चौकात आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक आंदोलनाची सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” ची जोरदार सुरुवात केली.

या मोर्चामध्ये विविध सामाजिक, राजकीय संघटना आणि बहुजन समाजातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. संविधान, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, बहुजनांच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरातील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततामय मार्गाने आपला निषेध नोंदवण्याचा निर्धार केला असून, पुढील काही दिवसांत हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!