27.3 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

महागाई, बेरोजगारी व NEET पेपरफुटी विरोधात जन आक्रोश

महागाई, बेरोजगारी व NEET पेपरफुटी विरोधात जन आक्रोश
प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा- नितीन सोनवणे
बीड, प्रतिनिधी : विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केले.

आंदोलनादरम्यान पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या महागाई आणि तुटवड्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच NEET पेपरफुटी प्रकरण, सुशिक्षित बेरोजगारी, शहरातील अतिक्रमण, रस्ते विकास, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न, खाजगी कोचिंग क्लासेसचे बाजारीकरण, सोशल मीडियावरील निर्बंध आणि विविध प्रलंबित प्रशासकीय मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बीड नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रोड चौक या मार्गावरील रस्त्याचे काम पूर्ण करावे, तसेच नगरपरिषद निवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, NEET पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, बीड जिल्ह्यातील शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या खासगी क्लासेसचे ऑडिट करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली.

तलवाडा पोलीस स्टेशन येथे POSCO व SC-ST कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनात युवा जिल्हाध्यक्ष सुंदर वाघमारे, जिल्हा सरचिटणीस प्रतीक वाघमारे, जिल्हा प्रवक्ता निलेश वाघमारे, शहराध्यक्ष राजेश वडमारे, शहर संघटक आनंद डोंगरे, युवा शहराध्यक्ष विकास शिंदे, भीमराव कुठे, कोंडीबा लांडगे, शशिकला लांडगे, वैष्णवी लांडगे, प्रेमकुमार कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी नितीन सोनवणे यांनी प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांवर तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!