27.3 C
New York
Tuesday, August 4, 2026

Buy now

spot_img
spot_img

आरक्षण उप वर्गीकरण विरोधात १७ जून रोजी परभणीत संविधान बचाव मोर्चाचे आयोजन

आरक्षण उप वर्गीकरण विरोधात १७ जून रोजी
परभणीत संविधान बचाव मोर्चाचे आयोजन

परभणी l प्रतिनिधी, संजय बगाटे
आरक्षण उप वर्गीकरण हे असंविधानिक आहे. दहशतवाद आतंकवादी प्रमाणेच हे जातंकवादी षडयंत्र असून या विरोधात १७ जून रोजी शनिवार बाजार ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा भव्य संविधान बचाव मोर्चा काढण्याचा ठराव आज झालेल्या गौतम नगर येथील बैठकीत घेण्यात आला.
अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष पु.भंते मुदितानंद थेरो व भंते एस संघमित्र यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेकांनी आपल्या सूचना व मोर्चाच्या नियोजनसदर्भात चर्चा केली.
या पूर्वी नियोजनाच्या दोन बैठका घेण्यात आल्या होत्या.आज झालेल्या बैठकीत मोर्चाची तारीख जाहीर करण्यात आली.या मोर्चात सहभागी होण्यासाठी परभणी शहर सोबतच संपूर्ण जिल्ह्यातून समाजाला आवाहन केले जाणार आहे.
बैठकीत प्रारंभी शहीद बालक स्मृतींना व धोंडाबाई पोचीराम कांबळे, ॲड एकनाथ आव्हाड,विजय वाकोडे,सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करण्यात आले.
या बैठकीत तालुका पातळीवरील मोजके प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले.
विजय वाकोडे यांच्या निधनानंतर जिल्ह्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली या पार्श्वभूमीवर मोर्चाची खबरदारी सर्वांनी घ्यावी असा ही सूर उमटला.या बिठकीस शहरातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!