कन्नड : लक्ष्मण गं. वाल्डे लिखित साहित्यातला अनोखा प्रयोग टेलर या कवितासंग्रहाचे प्रकाशन आईवडील -श्री.गंगाधर सुभाजी वाल्डे सौ.शांताबाई गंगाधर वाल्डे तसेच कन्नड तालुक्यातील समस्त टेलरांच्या हस्ते “टेलर” या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
‘टेलर’ मधून श्रमजीवनाचा वेध
युवा कवी लक्ष्मण गं. वाल्डे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन
कन्नड : टेलर समाजाचे श्रमजीवन, वेदना, संघर्ष आणि जगण्याचे वास्तव कवितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणाऱ्या युवा कवी लक्ष्मण गं. वाल्डे यांच्या ‘टेलर’ या कविता संग्रहाचे प्रकाशन लोकनेते सहकारमहर्षी बाळासाहेब पवार वाचनालयात उत्साहात संपन्न झाला.
व्यवसायाने टेलर असलेले ज्येष्ठ साहित्यिक निवृत्ती काळे (वैजापूरकर), कवीचे वडील गंगाधर वाल्डे व आई शांताबाई वाल्डे यांच्या हस्ते व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय भोसले सरांच्या अध्यक्षतेखाली टेलर या कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले.
ज्येष्ठ लेखिका प्रतिभा अहिरे यांनी संग्रहावर सखोल भाष्य करत नवोदित कवींना काव्यलेखनाबाबत मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी कवीच्या साहित्यिक नव्या प्रयोगाचे कौतुक केले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र झाडे यांनीही संग्रहाला भरभरून शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ साहित्यिक निवृत्ती काळे यांनी संग्रहाची प्रस्तावना लिहिली असून, देवीदास सौदागर यांनी आकर्षक पाठराखण केली आहे. निवृती काळे यांनी त्यांच्या मनोगतातून ‘टेलर’च्या साहित्यिक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ज्येष्ठ लेखक डॉ. शिवाजी हुसे यांनी टेलर वर्गाच्या समस्या, दुःख आणि संघर्षाचा व्यापक पट या संग्रहातून मांडल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्ताविक करताना पेरणीकार ज्ञानेश्वर गायके म्हणाले, टेलर वर्गाचे दुःख, वेदना आणि जगण्याचे वास्तव यापूर्वी कथा-कादंबरीतून मांडले गेले आहे. मात्र कवितेसारख्या लघु साहित्यप्रकारातून या समाजाचा व्यापक जीवनपट मांडण्याचा आगळावेगळा प्रयोग लक्ष्मण गं. वाल्डे यांनी केला आहे.
ॲड. कृष्णा पाटील जाधव यांनी संग्रहावर भाष्य करत कवीच्या ग्रामीण जीवनानुभवांवर आधारित कविता सादर केली. यावेळी समस्त पत्रकार, तिफण परिवाराचे सदस्य, साहित्यिक, कवी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रवीण दाभाडे यांनी केले, तर आभार कवी लक्ष्मण वाल्डे यांनी मानले.व्यासपीठावरील समस्त मान्यवरांनी व कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कवी- संदीप वाकडे, श्रीराम दाबके, अशोक दुधकर, रमेश वाघचौरे, रामेश्वर मोरे, सुरेश औटे, अण्णा मोरस्कर, प्रकाश शहरवाले, भीमराव सोनवणे, शुभदा देवरे, पुजा चव्हाण,
आदी कवी कवयित्री उपस्थित होते. त्याचबरोबर काकाश्री ठकाजी वाल्डे, काकू सौ. इंदूबाई वाल्डे, अर्धांगिनी
सौ. रंजना वाल्डे, कु.वेदिका वाल्डे, चि. वेदांत वाल्डे, रवी वाल्डे, सागर वाल्डे, विशाल वाल्डे, रितेश श्रीनाथे, जोगेश्वर लाडे, विकास काकडे, दिपक देशमुख, काळे सर, ऋषी शिवदे, व समस्त वाचनालय टीम, समस्त पत्रकार टीम आदी उपस्थित होते.


