29.1 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

बौद्ध समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; विलास काकडेविरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मे (प्रतिनिधी)

बौद्ध समाजातील तरुणी, महिला तसेच आया-बहिणींविषयी सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या विलास काकडे याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिसरवाडी परिसरात राहणाऱ्या विलास काकडे याने फेसबुकवर बौद्ध समाजातील महिला व तरुणींविषयी अवमानकारक आणि अश्लील स्वरूपाची पोस्ट प्रसारित केली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आंबेडकरी समाजातील नागरिक, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आणि सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत विलास काकडे याच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, बौद्ध समाजातील महिला आणि माता-भगिनींचा अवमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्याची भीती राहिली पाहिजे, अशी भावना आंबेडकरी समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!