29.1 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मोठी राजकीय घडामोड

मुंबई, प्रतिनिधी :भोंदूबाबा आणि स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांमध्ये अटक झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मोठ्या अडचणीत सापडल्या होत्या. खरातसोबतचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका करत राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

या प्रकरणात दररोज नवनवीन व्हिडिओ आणि फोटो समोर येत असल्याने राजकीय वातावरण तापले होते. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही या प्रकरणावर नाराजी व्यक्त होत होती. पक्षातील काही नेत्यांनीही उघडपणे चाकणकरांवर टीका केली.

या सर्व घडामोडींमुळे दबाव वाढत असतानाच चाकणकर यांनी मुंबईत पोलीस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. जवळपास २० ते २५ मिनिटे झालेल्या या बैठकीत चाकणकर यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला.

हा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्देशून लिहिण्यात आला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!