spot_img
spot_img
spot_img
spot_img

प्रेमगंध”हृदयातील स्पंदने मनाची अवस्था:-डाॅ.मधुकर दिवेकर

“प्रेमगंध”हृदयातील स्पंदने मनाची अवस्था:-डाॅ.मधुकर दिवेकर
पुस्तक परिचय:-प्रेमगंध काव्यसंग्रह
साहित्य क्षेत्रातील व कविताच्या नव्या पिढीतील एक उमदा प्रतिभावंत कवी.मा. धम्मोदय वाघमारे हे आपली पहिली वहिली काव्यसृष्टी
“प्रेमगंध”च्या रूपाने वाचकाच्या भेटीला येत आहे मी प्रारंभीच त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो
खरे तर प्रेमगंध या काव्यसंग्रहाचे प्रस्तावितक आपण प्रेममय परिस्पर्शाने लिहावे म्हणजे शब्दांचे सोने होतील
असे आग्रहाचे शब्द बोल..
त्याबद्दल कवीचे मी मनस्वी आभार मानतो .
कवी मनाला पडलेले स्वप्न स्वप्नांचे तरंग, स्वप्नांचे वलय, प्रेम भावनेतून मेंदूला नवतरुण ठेवण्याची ऊर्जा सदैव तेवत राहते
हृदयाची स्पंदने मनातील काहुर शब्द रूपाने प्रेमगंध रूपांतरित होताना मनाची अवस्था ही काव्यसंग्रहातून प्रत्येक सृजन वाचकाला क्षणाक्षणाला उत्कंठा वाटत जाईलच तसेच भावभावनांचा विचार मंथनातून झालेली काटेरी वाट वाटेवरून चालणारे पाऊलवाट नव्याने कवींनी तयार केली आहे
प्रेम भावनेतून आलेले अनुभव हे सत्य किंवा काल्पनिक असू शकतात
हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा आयुष्यातील तारुण्याचा उंबरठ्यावरील एक सुवर्ण क्षण…
जीवन प्रेमाची सुरेख जोडी शब्द रूपात मांडताना क्षणाक्षणाला प्रेम हे भक्तीचे रूप, प्रेम हे श्रद्धेचे रूप, प्रेम हे विश्वसाचे रुप, आणि प्रेम हे प्रेमाचे रूप सर्वश्रेष्ठ रूप संपूर्ण जगाला गवसणी घातली आहे परंतु सर्वांचेच प्रेम यशस्वी झाले असे नाही
काहींना जातीयतेचे चटके बसले तर काहींना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला यातून ज्यांना प्रेममय सुखरूप रस्ता मिळाला त्यांनी प्रेमाचे व आयुष्याचे सोने केले
काहींच्या जीवनात प्रेमाने प्रेम वेडे झाले तर आयुष्यातून उध्वस्तही झाले ही प्रेमाची यशोगाथा युगाने युगे चालत आलेली आहे
यात आपण कशा पद्धतीने प्रेमाकडे बघतो हे आपल्याला शब्दातून कळेल
कवी आपल्या प्रेयसीला म्हणतो

कवी आपल्या प्रियसीला म्हणतो
सखे नजर माझी
तुझ्या नजरेला भिडली
खरंच सखे आपली मैत्री
आता प्रेमाच्या रूपात झाली
ही मंगल मैत्री आपल्या प्रियसीला अभिवचन देऊन प्रेमाचे रूप व्यक्त करताना
कवी पुढे म्हणतो

सखे चांगला संदेश पाठवून
हास्य सकाळ करतेस
दिवस चांगला गेला की
म्हणून तू मला रात्री विचारतेस

प्रेममय जीवनाचा सकाळचा संदेश कोवळ्या सूर्यकिरणांच्या प्रेरणादायी किरणे गाली खळी पाडून हास्याचा कल्लोळ नजरेत भरतो आणि पूर्ण दिवस आनंदमय जातो दिवस सरतो आणि रात्र डोक्यावर येते आणि अलगद प्रेयसी आपल्या प्रेमिकाला विचारते

त्यावेळेस कवी मनाचा हृदयाचे स्पंदन अंकुरित होऊन आपल्या प्रियसीला जीवापाड प्रेमाच्या अनाभाखा खाताना कवी म्हणतो
सखे मी जिवापाड प्रेम करतोय
करू नकोस विश्वास घात
खरंच तुझ्यावर प्रेम करतोय
आडवी आणू नकोस तुझी जात

या ठिकाणी कवींच्या मनात अनेक जातीयतेने पोळलेल्या मनाच्या जखमा जागृत होऊन मनात विचाराचे काहुर निर्माण होते आणि आपल्या प्रियसीला प्रांजळपणाने न संकोच आपल्या प्रेमात तुझी जात आडवी आणू नकोस सांगताना़ कवी मन विसरत नाही
कधीकधी मनात सुसंगत विचाराची गाथा बुद्धीला पटवत असतानाच नकळत सखे तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस असे…
सखे ये जरा जवळ
नको राहू माझ्यापासून दूर
तू गेलीस तर
वाहतोय नयनातून पूर

कवींच्या भावना व्यक्त होताना तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस यदि कदाचित गेलीस तर मला करमत नाही आणि नयनातून सुखदुःखाच्या लाटांचा प्रवाह सतावतो
कवी आपल्या प्रियसी वर जीवापाड प्रेम करतो प्रेमा मधल्या असंख्य भेटवस्तू ह्या हृदयातील प्रेमांकुर प्रफलित होऊन तू सुंदर दिसावी त्यासाठी मी तुझ्यासाठी काय भेट देऊ

सखे पाहतेस एकटक मला
हसतेस तू गाली
तुझ्या ओठावर लावण्यासाठी
आणली मी लाली

या ठिकाणी सुंदरतेचा नमुना आपल्या प्रेयसीला लालीच्या भेटीतून प्रियकर देताना अगदी कधी कधी म्हणाला हुरहुरीही लागते आणि
सखे मी एकटा
तुझ्याविना राहू कसा
तुझ्यासोबत घातलेल्या क्षणाची
आठवण येता झालो मी वेडापिसा
आपल्या प्रियसीच्या प्रेमापाई एकटा राहू शकत नाही आणि तिच्या प्रेमापाई कधी कधी वेडापिसा होऊन तिच्या प्रेमाच्या आणाभाका दिल्या घेतल्या वचनांची शपथ घेऊन कवी पुढे म्हणतो
सखे तू हमेशा येत जा मला भेटत जा

सखे तू प्रेम केल्यामुळे
खूप फरक पडला
तुझ्या येण्याने खूप
आनंद मनाला झाला
एकमेकाच्या प्रेमाप्रती आपल्या प्रेयसीला तू प्रेम केल्यामुळे माझे आयुष्य आनंदमय झाले आहे तू ज्या ज्या वेळेस भेटण्यासाठी येतेस त्यावेळेस मन आनंदी होऊन मोरासारखे थुई थुई नाचायला लागते
प्रेम ऋतुचा बहर येतो एकमेकाच्या डोळ्यात प्रेमाच्या कारांच्या गारव्यातून प्रफुल्लित होऊन कवी आपल्या प्रेयसीला म्हणतो

सखे आपली झाली
एका ठिकाणी नजरा नजर
हास्य फुलवून प्रेमाच्या रूपात
ओळख झाली खोलवर

अशी ही प्रीत गगनाला भिडली आणि एकमेकाच्या भेटी गाठी तासंतास चालू होते परंतु काही कामाच्या अडथळ्यामुळे प्रियसी आपल्या प्रियकराला भेटू शकत नाही त्यावेळेस कवी म्हणतो प्रेयसीला

सखे तासनतास वेळ वाया घालवतो
तुझी वाट पाहण्यात
तु सांगतेस संदेश पाठवूनी
नंतर बोलूया आपण मी आहे कामात

ज्या ज्या वेळेस भेटण्यासाठी इच्छा
होते आणि प्रियसी येत नाही त्यावेळेस प्रियकर आपल्या प्रियसीला निरोप पाठवण्यासाठी पेन आणि वही घेऊन लिहिण्यास बसतो त्यावेळेस कवी म्हणतो

सखे आज लिहायला बसलो
माझ्या जीवनाची कहाणी
खरंच तू माझ्यावर प्रेम केलेस
डोळ्यात येते पाणी

आपल्या प्रेमाची प्रेम कहाणी लिहीत असताना वेगवेगळ्या प्रसंगाची आठवण ठेवून आठवणींना उजाळा देताना डोळ्यात गंगा जमुनेचा महापूर येतो
सखे हृदयाच्या कप्प्यात
जपून तू आपुलकी जिव्हाळा
प्रेमाच्या बंधनात तू मला अडकून
जीवन सुखकर झाले उन्हाळा पावसाळा हिवाळा
कवी मनाचा प्रेम बंधन तीन ऋतूतील प्रेममय उन्हाळा तर कधी पावसाळा सुखदुःखाचा लाटावरती आनंदमय गारवा हिवाळा ऋतू तुनअनुभवताना
प्रेमाचा उबदार पणा जाणवतो
भेटीगाठीच्या प्रसंगातून शेवटी घर गाठावेच लागते नकळत झालेल्या भेटीगाठीतून जाताना प्रेमाचा निरोप देताना

कवी म्हणतो

सखे घायाळ झालो
तुझ्या गालावरची पाहून खळी
खरंच तू वागतेस
जणू सौंदर्याने साधी भोळी
आपल्या प्रियसीचे वर्णन करताना गाली पडते हास्य खळी पाहून मनाला झालेला आनंद हा शब्दात मांडता येत नाही परंतु तू अतिशय साधी भोळी सौंदर्याची खान आहेस सांगण्यास कवी विसरत नाही
सखे आनंदाच्या शिखरावरुन
तू मला दुसरे व्यसन लावलेस
दिलेले वचन मोडून
दुसऱ्याला का घरात आणलेस
कवी म्हणाला प्रेमाची नशा उंच शिखरावर निघून विराजमान केलेली असतानाच प्रियशीच्या मनाला कुठेतरी कुठेच पोहोचतात क्षणी दुसऱ्याचा विचार मनात आणला अशा शब्दात घरात आणले म्हणजे हृदयातील वेदनांचा अंकुर कुठेतरी फुटल्या गत कवीला जाणवते त्यातून कवी म्हणतो

सखे सांग ना
मी काय केला गुन्हा
तुझी आठवण येते
मला पुन्हा पुन्हा

या ठिकाणी कवीच्या मनाला झालेला विरह पचनी पडत नाही आणि आपल्या प्रेयसीला पुन्हा पुन्हा मी काय गुन्हा केला सांगण्यासाठी प्रवृत्त करतो आणि बेचेन मनाला समजावून सांगत असताना घडलेल्या प्रकाराची चर्चा गावभर होते हे सांगण्यासही कवी मागेपुढे पहात नाही तो आपल्या प्रेयसीला मोठ्या मनाने प्रांजळपणे
सांगतो म्हणतो
सखे तुझ्या अन माझ्या
लफड्याची चर्चा झाली गावभर
खरंच चर्चा होत असल्याने
गावात थांबावेसे वाटत नाही क्षणभर
प्रेमाची चर्चा गावभर सुरू होते मन बेचैन होते जीव नकोसा होतो गावातून गावातून क्षणभरही थांबण्याची इच्छा होत नाही कुठेतरी दूर….. जाण्याची इच्छा आकांक्षा मनी भिरभरी लागते तरीदेखील प्रेमाच्या अनाभाका घेतल्या असताना पुन्हा सखे ला फुल देण्याचा व मनवण्याचा प्रयत्न करत असताना कवी म्हणतो
सखे तुला गुलाबाचे फुल देताना
तू माझ्यावर खूप भडकली
तुला प्रेम करायचे नव्हते
तू मला का कानाखाली मारली
या ठिकाणी प्रेमाच्या वचनांचा कुठेतरी दुरु उपयोग झालेला दिसतो एकमेकाप्रती असलेला आदरभाव कुचकामी ठरतो प्रेमाला गालबोट लागते आणि प्रियसी आपल्या प्रियकराच्या कानाखाली मारण्याचा प्रयत्न जाणून-बुजून करते प्रेमापोटी दिलेले गुलाबाचे फुल नस्वीकारताच धिक्कार करते
आपले प्रेम आता विकोपाला गेले आहे त्यावर कुठलीही मलमपट्टी आता करण्याची गरज नाही हे सांगताना कवी मन आपल्या प्रेयसीला व्याकुळतेने सांगण्याचा प्रयत्न करतो कवी म्हणतो
सखे तुझ्यामुळे
झालेली जखम
आता लावू नको
त्या जागेवर मलम
तुटलेल्या प्रेम प्रेमाची नाती आणि दुभंगलेले मन मनातील काहुर आता त्यावर कोणताही इलाज नाही स्पष्टपणे सांगताना कवी म्हणतो तु कितीही मला नाकारले तरीही माझे तुझ्यावर आता नात जीवापाड असलेले प्रेम सदैव अजरामर राहील आणि आहे कवी म्हणतो
सखे छोट्या छोट्या कारणावरून
नको तू माझ्यावर रुसवात धरू
उठता बसता उचकी लागली
सखे तू तक्रार नको करू
प्रियकर आपल्या प्रियसीला वारंवार बनवण्याचा प्रयत्न करत असताना छोट्या छोट्या गोष्टीवरून तू रुसवा धरू नकोस यापुढेही जाऊन कवी म्हणतो यदी कदाचित तुला वारंवार माझी आठवण येत असेल आणि तुला जर उचकी लागली तर माझ्याकडे तक्रार करू नकोस कारण मी केलेल्या जीवापाड प्रेमाची ही प्रेम कहाणी सदैव अजरामर राहणार आहे आणि तुला त्याची क्षणाक्षणाला उचकी आठवण रुपी लागणार आहे त्यामुळे तुला तक्रार करण्याचा अधिकार नाही
हे सांगताना कवी आपल्यात कोणत्या कारणामुळे दुरावा होत चालला आहे त्याचा मला पुरावा तुझ्याकडे आहे का हे सांगताना विसरतही नाही
कवी म्हणतो

सखे कशामुळे
होतो आपल्यात दुरावा
प्रेम संबंध तोडण्यासाठी
आहे का तुझ्याकडे पुरावा

अतिशय सुंदररीत्या दोन जीवाची प्रेम कहानी सुरुवात होऊन आनंदमय जीवनाचा हिमालय चढतात उंच शिखरावर जाऊन आज हल्लीच्या जमान्यात प्रेम प्रकरणातून अनेक प्रसंगांना छोट्या छोट्या गोष्टीवरून भेदाभेद होऊन प्रेमाची दूर अवस्था होत चाललेली असताना त्या प्रेमाचा दुराव्यासाठी पुराव्याची गरज तुझ्याकडे आहे का हे ठणकावून सांगताना कवी मागेपुढे राहत नाही अतिशय सुंदररित्या आपल्या भावभावनांचा प्रेममय शब्दाचा हितगुज करताना प्रेमातून आलेले प्रेम प्रीतीच्या भावभावनांचा झालेला विरह, मनाचा गोंधळ आणि गोंधळलेले मन मनाची झालेली अवहेलना यातून स्पष्ट दिसते
कवी मनाचा एकंदरीत विचार करता झालेले प्रेम प्रेमातून आनंद आनंदातून भावभावनांचा कल्लोळ दिसतो
भावनात्मक शब्दांचा व प्रेम कहाणीचा आपण शब्दशः अर्थ न लावता कवी मनाचा मोठेपणा समजून घ्यावा प्रेम कशा पद्धतीने होते कशामुळे दुराभाव निर्माण होतो हा भावनांचा पीळ खऱ्या अर्थाने समजून घेतला तर एक परिपूर्ण प्रेम कहानी आजरामर होते
या प्रेमगंध काव्यसंग्रह भरभरून शुभेच्छा पुढील काव्यपुष्पासाठी व साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारीसाठी मनःपूर्वक सदिच्छा

प्रेमगंध(चारोळी संग्रह)
कवी. धम्मोदय वाघमारे
साहित्य सेवा प्रकाशन औरंगाबाद
पृष्ठ संख्या ६८
किंमत -₹८०

Epaper Website

Related Articles

बौद्ध समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; विलास काकडेविरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मे (प्रतिनिधी) बौद्ध समाजातील तरुणी, महिला तसेच आया-बहिणींविषयी सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या विलास...

रमाबाई ची ‘ रमाई ‘ होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग.

रमाबाई ची ' रमाई ' होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दिनांक ४ एप्रिल १९०६ रोजी रमाबाई यांचा विवाह झाला . विवाहाच्या आधी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!