भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने लेखक अनिल भगवान चव्हाण सन्मानित…
चिखली :स्थानिक येवता, ता. चिखली येथील प्रसिद्ध लेखक, कवी, शिक्षक अनिल भगवान चव्हाण (ABC )यांना नुकतेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाशिक येथील ज्ञानदिप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने दि. 23 मे रोजी नाशिक येथील समुद्रा लॉन्स याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार लेखक अनिल चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.. येवता सारख्या छोट्या गावातून सातत्याने लिखाण करणाऱ्या अनिल चव्हाण यांची आतापर्यंत चार पुस्तकं प्रकाशित झाली आहे, नुकताच त्यांचा शोध सुखाचा हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे..अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले अनिल चव्हाण गेल्या अनेक वर्षांपासून लिखाणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहेत त्यांच्या ह्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार मा. आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हे क्षण खूप आनंददायी आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माझ्या जीवनाच सोनं झालं आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याच नावाने आयुष्यातला पहिला पुरस्कार मिळाला हे क्षण आनंददायी आणि अविस्मरणीय आहेत अश्या भावना अनिल चव्हाण यांनी व्यक्त केल्या.. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे…”




