25.4 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिकलठाण्यात अनधिकृत होर्डिंग काढताना मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू; आयुक्त जी. श्रीकांत यांची १ कोटीं १५ लाखाची मदत जाहीर.

चिकलठाण्यात अनधिकृत होर्डिंग काढताना मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू; आयुक्त जी. श्रीकांत यांची १ कोटीं १५ लाखाची मदत मदत जाहीर.

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :
चिकलठाणा परिसरात अनधिकृत होर्डिंग काढण्याच्या कारवाईदरम्यान महापालिकेचे सफाई कर्मचारी अमोल जाधव यांचा विजेचा तीव्र शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्याचा बळी गेल्याने शहरभर संतापाची लाट उसळली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक असून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनपाच्या पथकाकडून अनधिकृत होर्डिंग हटविण्याची मोहीम सुरू होती. संबंधित ठिकाणी विजेचा पुरवठा पूर्णपणे खंडित केला होता का? आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध होती का? अशा प्रश्नांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर बोट ठेवले जात आहे. योग्य खबरदारी घेण्यात त्रुटी राहिल्या का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कठोर कारवाई होते का? कारवाईदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? अशा अनेक मुद्द्यांवर आता चर्चा रंगली आहे. निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी अमोल जाधव यांच्या कुटुंबीयांना एक कोटी पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच त्यांच्या पत्नीला लाडपांगे समिती अंतर्गत नोकरी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सर्व शासकीय सहाय्य तत्काळ देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

याशिवाय, ज्या ठिकाणी संबंधित अनधिकृत बॅनर लावण्यात आले होते, त्या बॅनरचे फोटो उपलब्ध असून संबंधित जबाबदार व्यक्तींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी दिली. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कर्तव्यावर असताना अमोल जाधव यांना आपला जीव गमवावा लागला, या घटनेने संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे. प्रशासनाने केवळ आर्थिक मदत जाहीर करून न थांबता भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस सुरक्षा धोरण राबवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!