छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. अतुलजी सावे साहेब यांच्या विशेष निधीतून करण्यात आलेल्या विकासकामांचा शुभारंभ उत्साहात पार पडला. श्री. पारे मामा यांच्या घरासमोरील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण तसेच श्री. कुलकर्णी ते श्री. शेवाळे यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईनच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास सिडको मंडळाचे अध्यक्ष श्री. अमेय भाऊ देशमुख, मा. नगरसेवक श्री. हुशारसिंग भाऊ चव्हाण, श्री. अरुण भाऊ पालवे, श्री. नितीन भाऊ खरात, श्री. रावसाहेब लहाने, मंडळ सरचिटणीस श्री. अविनाश पवार, बूथ अध्यक्ष श्री. गजानन टेकाळे, सौ. उषाताई काळे, नंदाताई पांडे, सौ. आशाताई वानखेडे, छाया हरपाळे, रामदास गायकवाड, सिडको महिला मोर्चाच्या मंडळाध्यक्षा सौ. लक्ष्मी गायकवाड तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



