17.9 C
New York
Wednesday, September 30, 2026

Buy now

spot_img
spot_img

अनाथ, निराधार मातांसाठी नवा आधार,पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते ‘माई वृद्धाश्रम’ नवीन इमारतीचे लोकार्पण.

अनाथ, निराधार मातांसाठी नवा आधार,पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते ‘माई वृद्धाश्रम’ नवीन इमारतीचे लोकार्पण.

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी :
अनाथ, निराधार व वंचित मातांच्या आश्रयी ठरणाऱ्या माई वृद्धाश्रमाच्या नव्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते शुक्रवारी उत्साहात पार पडले. समाजातील अनाथ निराधार वृद्ध मातांना सुरक्षित जीवन आणि आत्मीयतेचा स्पर्श देणाऱ्या या प्रकल्पाने नव्या उंचीचा टप्पा गाठल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
.“अनाथ मातांच्या जीवनात पुन्हा एकदा मानवी स्पर्श निर्माण करणे हीच खरी सेवा,” असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगत माई वृद्धाश्रमाच्या कार्याचे कौतुक केले. वृद्धाश्रम उघडणे खरंतर माझ्या मनाला पटत नाही, परंतु अनाथ माईंना सांभाळावे कोणी हा एक मोठा प्रश्न आहे. रामदास वाघमारे मीरा वाघमारे हे शिक्षक दांपत्य आज अनेक माईंचा सांभाळ करत आहेत त्यांना खरोखरच शुभेच्छा देतो.

माई वृद्धाश्रमाच्या नव्या इमारतीत प्रशस्त खोल्या, स्वतंत्र संडास–बाथरूम व्यवस्था, स्वच्छ स्वयंपाकगृह, विश्रामगृहे, औषधोपचार सुविधा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल अशा सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या लोकार्पण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन माजी उपमहापौर, अनिल साबळे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, रवींद्र निकम अतिरिक्त आयुक्त मनपा, शिवाजी फड माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, विठाई बोर्डे संचालक संत कबीर शिक्षण मंडळ, पदमा तापडिया संचालिका मातोश्री वृद्धाश्रम, सागर पागोरे व्यवस्थापक मातोश्री वृद्धाश्रम, गणेश डोणगावकर संचालक आधार वृद्धाश्रम, उत्तम वाघमारे सरपंच, नरेंद्र वैद्य संचालक आस्था फाऊंडेशन, तसेच ॲड. शिरीन वारे, डॉ.आबासाहेब चेन्ने, डॉ. संकेत चन्ने, एच. आय. शेख, गुरुपाल राठोड, सुनील कोतकर, सतीश जाधव, चंद्रशेखर जाधव, ज्योती रस्तोगी, गंगा पाटील, प्रवीण केदार आदींची उपस्थिती लाभली.

माई वृद्धाश्रमाच्या उभारणीत सर्वस्व अर्पण करणारे संचालक समाजभूषण रामदास वाघमारे संचालिका मीरा वाघमारे व संस्थेचे पदाधिकारी अंशीराम वाघमारे, संदीप अझादे,अमर सपाटे, प्रेरणा अझादे, मच्छिंद्र वाघमारे, अनिल वाघमारे, धोंडीभाऊ वाघमारे, कपिल वाघमारे, सूर्यधन वाघमारे, बाळू वाघमारे यांच्या टीमने परिश्रमाची पराकाष्ठा केली असून, या सामुहिक कार्यामुळेच माई वृद्धाश्रमाची ही नवी इमारत प्रत्यक्षात आली.“आमचं ध्येय कोणतीही माई रस्त्यावर भटकू नये तिला मायेचं छत मिळावं,” असे वृद्धाश्रमाच्या संचालिका मीरा वाघमारे आणि परिवाराने सांगितले.

या लोकार्पण प्रसंगी सर्व मान्यवरांनी समाजातील सर्वसामान्य नागरिक, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि युवकांनी वृद्ध मातांच्या सेवेसाठी हात पुढे करण्याचे आवाहन केले.वृद्धाश्रमाचे सामाजिक भान जागवणारे कार्य हे आजच्या काळात मानवतेचे खरे मंदिर असल्याचे मत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपले मत व्यक्त केले.

उद्घाटनानंतर आश्रमातील मातांशी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संवाद साधला यावेळी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. अनाथ मातांना मिळालेला सुरक्षित घराचा स्पर्श, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि “आम्हाला आमचं घर मिळालं” हा त्यांचा भावनिक प्रतिसाद उपस्थितांना अंतर्मुख करणारा ठरला.

या नव्या इमारतीमुळे अनेक वृद्ध मातांच्या जीवनात प्रकाशाचा नवा किरण फुलणार आहे. समाजातील सर्वच घटकांनी अशा सेवाभावी कार्यांना पाठिंबा देत राहणे हीच खरी मानवसेवा आहे.माई वृद्धाश्रमाचे हे पाऊल अनाथ, निराधार मातांसाठी नव्या आशेचा दीप समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

 

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!