27.3 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी वादळ : गिरीश महाजनांच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नाही; महिला अधिकाऱ्याचा थेट सवाल, व्हिडिओ व्हायरल

प्रतिनिधी | नाशिक

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा गौरव करणाऱ्या दिवशीच महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याचा आरोप करण्यात येत असून, यासंदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वन विभागातील महिला अधिकारी माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठावरून प्रश्न उपस्थित करत,“प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा थेट सवाल केला. त्यांच्या या प्रश्नामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली.‘माफी मागणार नाही, निलंबन जरी झाले तरी…’व्हायरल व्हिडिओत महिला अधिकारी म्हणताना स्पष्टपणे दिसतात की,“मला निलंबनाची कारवाई झाली तरी चालेल, पण बाबासाहेबांच्या योगदानावर गप्प बसणार नाही.”या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये टाळ्या वाजल्या तर दुसरीकडे सत्ताधारी गटात अस्वस्थता निर्माण झाली.पोलिस हस्तक्षेप, तणावाचे वातावरण प्रश्नोत्तराचा हा प्रकार वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधित महिला अधिकाऱ्याला ताब्यात घेतले, यानंतर कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा संपूर्ण प्रकार उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रीत केल्याने व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. आंबेडकरी संघटनांचा संताप

या घटनेनंतर आंबेडकरी विचारधारेच्या संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.“संविधानाचा उत्सव साजरा करताना संविधानकर्त्याचे नाव न घेणे ही गंभीर बाब असून, हा केवळ विसर नाही तर मानसिकतेचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया उमटत आहे. राजकीय पडसाद होण्याची शक्यता या प्रकरणाचे राजकीय पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता असून, विरोधकांनीही या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली आहे. सोशल मीडियावर ‘बाबासाहेबांचे नाव विसरणे नाही, विसरवले जात आहे का?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा सन्मान…आणि संविधान म्हणजे बाबासाहेब!अशा दिवशी बाबासाहेबांचे नाव न घेतले जाणे हा केवळ योगायोग आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्षहा प्रश्न आता नाशिकपुरता मर्यादित न राहता राज्यव्यापी चर्चेचा विषय ठरत आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!