29.1 C
New York
Monday, August 3, 2026

Buy now

spot_img
spot_img

उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरावर ACBचा छापा; ८.३० कोटींची बेहिशेबी संपत्ती उघड, नोटांच्या ढिगाऱ्यांनी अधिकारीही स्तब्ध.

तेलंगणातील महसूल विभागाला हादरवून सोडणारी मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केली आहे. हनुमाकोंडा येथील उपजिल्हाधिकारी वेंकट रेड्डी यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल ८ कोटी ३० लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली असून, या कारवाईने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी ACBच्या विशेष पथकाने वेंकट रेड्डी यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या एकूण आठ ठिकाणांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. या कारवाईत हैदराबादमधील पॉश रॉकी टाऊन कॉलनीतील आलिशान घराचाही समावेश होता. छाप्यात समोर आलेले नोटांचे ढीग, मौल्यवान दागिने आणि मालमत्तेची यादी पाहून तपास अधिकारीही अवाक् झाले.ACBने दिलेल्या माहितीनुसार,३० लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.६ कोटी रुपये किमतीचा आलिशान विला व फार्महाऊस आढळून आला आहे.मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत एकूण ८ कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता उघड झाली असून, तपास सुरू असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.तपासात असेही समोर आले आहे की, वेंकट रेड्डी यांनी २००८ पासूनच अवैध संपत्ती जमवण्यास सुरुवात केली होती. २०१६–१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.विशेष म्हणजे, जिल्हा शिक्षण अधिकारी असताना १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ६ डिसेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.या कारवाईमुळे तेलंगणातील भ्रष्टाचाराचा आणखी एक चेहरा उघड झाला असून, ACBकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

 

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!