24 C
New York
Tuesday, August 4, 2026

Buy now

spot_img
spot_img

बाबासाहेबांच्या फोटोची विटंबना करणाऱ्या अनिल मिश्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक : कोर्टाने जामीन नाकारल्यामुळे तुरुंगात मुक्काम.

ग्वालियर | प्रतिनिधी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान केल्याप्रकरणी ग्वालियरमधील वादग्रस्त प्रकरणात अनिल मिश्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी (जेल) सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे मध्यप्रदेशासह देशभरात आंबेडकरी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

ग्वालियर शहरात काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र जाळणे, अपमानास्पद घोषणा देणे आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप अनिल मिश्रा व त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिक, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी संघटनांकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच
प्रकरणाची गंभीर दखल घेत ग्वालियर पोलिसांनी अनिल मिश्रा यांच्यासह एकूण ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुख्य आरोपी अनिल मिश्रा आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने जामीन नाकारत आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.समाजात तणाव, पोलिस बंदोबस्त वाढवला
या घटनेनंतर ग्वालियरमध्ये काही भागांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कठोर कारवाईची मागणी,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय नेत्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध करत “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा संविधानाचा अपमान आहे” असे ठाम मत व्यक्त केले आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, समाजात द्वेष, तेढ किंवा जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!