spot_img
spot_img
spot_img
spot_img

भदंत, हर्षबोधी महाथेरो (बोधिराजकुमार खरात) यांना पाली व बुद्धधर्म विषयात पीएचडी पदवी प्रदान

छत्रपती संभाजीनगर : दि. १
निळे प्रतिक न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने “भारतातील प्राचीन बौद्धक्षेत्रे एक चिकित्सक अध्ययन” या प्रबंधास पीएच.डी.पदवीस मान्यता दिली असून, संशोधक भदंत, हर्षबोधी महाथेरो (बोधिराजकुमार किसन खरात) यांना विद्या शाखा मानविकी, विषय पाली आणि बुद्धधर्म अंतर्गत डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) पदवी प्रदान करण्यास पात्र ठरविले आहे.
पीएच.डी. ही नियमांनुसार पूर्ण करण्यात आले आहे. संशोधकांनी हा प्रबंध डॉ. भिक्खू एम. सत्यपाल, संशोधन मार्गदर्शक, पाली-बुद्धधर्म विभाग, मिलिंद महाविद्यालय कला शाखा, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. विद्यापीठ कॅम्पसमध्ये ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या वायवा-व्होसे परीक्षेनंतर संशोधकास पीएच.डी. पदवीस पात्र घोषित करण्यात आले. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे संचालक यांनी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी ही अधिकृत सूचना जारी केली.
भदंत हर्षबोधी महाथेरो यांच्या महत्वपूर्ण संशोधनाला शैक्षणिक क्षेत्रातून मोठी दखल मिळत असून, प्राचीन बौद्ध संस्कृती-अभ्यासाला यामुळे नवे शास्त्रीय अधिष्ठान लाभले आहे.
प्रा. भदन्त सुमेधबोधी महाथेरो (कालकथित) यांचे मोलांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच डॉ भदन्त खेमधम्मो महाथेरो, डॉ भदन्त एम.सत्यपाल महाथेरो, भदन्त नागघोष महाथेरो, भदन्त प्रज्ञाबोधी महाथेरो, भदन्त धम्मदीप महाथेरो, भदन्त धम्मशरणजी थेरो ,
उपासक/उपासिका
आयु. सुरेशजी खराटे , सुरेशभाई सोनवने (सुरत) अशोकजी येरेकर , संजय जगताप, कृष्णा बनकर, रतनकुमार साळवे, प्रल्हाद गवळी, प्रा.सिध्दार्थ गायकवाड , भिमज्योत खरात, गौतम कांबळे सर, सुरेश पांडे, सुर्यकांता गाडे मॅडम, कल्पना सिरसाट , डॉ योजना भगत , राशी मेहता ,आशा तेलगोटे , डॉ वैशाली खापर्डे मॅडम, डॉ वैशाली प्रधान, पंचशीला पांडे, नीलिमा डोंगरे , पुष्पा सावळे , प्रज्ञाकुमारी ,लता थोरात , धर्मानंद जाधव,बाबा तायडे,ओ सी सिरसाट, शकुंतला जाधव , डॉ प्रणिता जमधाडे , राजेंद्र जमधाडे, राजेंद्र साळुंके शकुंतला जाधव , डॉ प्रणिता जमधाडे , राजेंद्र जमधाडे, राजेंद्र साळुंके गणेश इंगळे यांचे सहकार्य लाभले आणि यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.

Epaper Website

Related Articles

राजकीय पक्षांना थेट आव्हान,जेलची भीती बाळगू नका, प्रकाश आंबेडकर

मुबई : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत...

अंजलीताई आंबेडकर यांची नांदेडमध्ये सक्षम ताटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट; “न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत आहोत” – ठाम भूमिका

नांदेड – सक्षम ताटे हत्या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले असताना, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!