24 C
New York
Tuesday, August 4, 2026

Buy now

spot_img
spot_img

लोकशाही हा भारताचे संविधानाचा प्राणवायू आहे. बी. बी. मेश्राम

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : शहरातील शंभू नगर येथील विक्रमशील बुद्ध विहारात “भारताचे संविधान” दिनाच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर २०२५ ला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना फुले शाहू आंबेडकरांईट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधानात मानवीय दृष्टिकोनातून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध कलमाद्वारे अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. ज्यात जात, धर्म, वंश, लिंग, परंपरा, प्रांत, भाषा इत्यादी बाबी वरून भेदभाव पाळता येणार नाही. तसेच सर्व नागरिकांना समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय प्रदान केलेले आहे. भारताच्या संविधानाविषयी व्यक्त होत असताना केवळ ‘संविधान’, ‘सविधान’ असे एकेरी बोलून चालणार नाही तर “भारताचे संविधान” असे स्पष्ट म्हटले पाहिजे. तशी तरतूद कलम ३९३ मध्ये केलेली आहे. ज्यामुळे भारतापासून संविधान वेगळे करता येणार नाही. तसे कोणी केले तर ते कुठल्या संविधानाविषयी बोलत आहेत, याचा अर्थ बोध होणार नाही. परिणामी समाज जीवनात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना होती म्हणून त्यांनी यासाठी स्वतंत्र एक कलम लिहून तशी तरतूद केलेली आहे.

भारताचे संविधान हे सामाजिक क्रांतीचे वाहन आहे. याची परिपूर्ण अंमलबजावणी केली तर समाज जीवनात जलद गतीने अमुलाग्र क्रांतिकारक बदल होण्याची दाट शक्यता आहे. ज्यातून वैश्विक बंधुत्व विकसित होऊ शकेल. करिता याची मार्मिकता मानवीय मनात प्रतिबिंबित करण्यासाठी संबंधित विचाराच्या अनुषंगाने मनाची मशागत केली पाहिजे. ज्या संविधानावर संपूर्ण देश चालतो ते “भारताचे संविधान” देशातील बहुतांश नागरिकांना माहीत नसावे. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकेल? लोकशाही हा भारताचे संविधानाचा प्राणवायू आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ डिसेंबर १९५२ ला पुण्याच्या लॉ लायब्ररीत दिलेल्या संदेशात संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक अटी आणि शर्तीचे मार्गदर्शन केले आहे. त्याचे आपण अनुसरण केले पाहिजे. करिता राज्यकर्त्यांनी देशातील सर्व नागरिकांना याची परिपूर्ण जाणीव व्हावी म्हणून स्वतंत्र उपाय योजना राबवून संबंधित मूल्यांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. जेणेकरून या देशातील सर्व नागरिक भारताचे संविधान अबाधित ठेवण्यासाठी आपली भूमिका नीट पार पाडू शकतील.
कार्यक्रमाची सुरुवातीला पंचशील, त्रिशरण व बुद्ध वंदना घेण्यात आली. आदर्शांना पुष्प व पुष्पमाला मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आल्या. याप्रसंगी अनामी मोरे, पांडुरंग वाकळे यांनी ही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून भारताचे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला पत्रकार सुजित ताजणे, आकाश भदर्गे, आकाश जाधव, गणेश म्हस्के, कुमार वाघमारे, प्रशांत जाधव, नितीन चाबुकस्वार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!