spot_img
spot_img
spot_img
spot_img

देवदत्त फिल्म्स्, फ्लावर फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनी मान्यवरांचा गौरव

देवदत्त फिल्म्स्, छत्रपती संभाजीनगर, दि. १२ (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यदिनाचा ७८ वा वर्धापनदिन तसेच मराठवाड्यातील पहिले दिग्दर्शक डॉ. देवदत्त म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त देवदत्त फिल्म्स् आणि फ्लावर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

नक्षत्रवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात दुपारी २ वाजता होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. देवदत्त म्हात्रे हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. शैलेश निकम उपस्थित राहणार आहेत.
यावेळी फ्लावर फाऊंडेशनच्या मतिमंद मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्‍या साहित्यिक डॉ. धोंडोपंत मानवतकर, समाजसेविका डॉ. प्रतिभा थोरात-मनवर, डीजी पोलीसपदकप्राप्त मच्छिंद्रनाथ जाधव, अभिनेते रमेश सोनवणे आणि कर्मचारी नेते धनंजय नारळे या मान्यवरांचा गौरवही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. पंजाबराव मोरे, संजय राजुरकर, राजू जाधव, सुरेखा राहुल म्हात्रे, राजेंद्र भालेराव आणि तेजस्विनी तुपसागर यांनी केले आहे.

Epaper Website

Related Articles

बौद्ध समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; विलास काकडेविरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मे (प्रतिनिधी) बौद्ध समाजातील तरुणी, महिला तसेच आया-बहिणींविषयी सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या विलास...

रमाबाई ची ‘ रमाई ‘ होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग.

रमाबाई ची ' रमाई ' होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दिनांक ४ एप्रिल १९०६ रोजी रमाबाई यांचा विवाह झाला . विवाहाच्या आधी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!