परभणी l प्रतिनिधी परभणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आज परभणी दौऱ्यावर येत असून एकाच दिवशी दहा सभांना संबोधित करणार आहेत.
पूर्णा तालुका
सकाळी ११ वाजता लक्ष्मी नगर,सकाळी १२ वाजता गौर,दुपारी १२:३० वाजता ताडकळस,पालम तालुका दुपारी १ वाजता पेठशीवणी,दुपारी २ वाजता चोरवड, गंगाखेड तालुका दुपारी ३ वाजता ईसाद,दुपारी ४ वाजता महातपुरी,सोनपेठ तालुका सायंकाळी ५ वाजता शेळगाव,पाथरी तालुका सायंकाळी ६ वाजता बाभळगाव,
सायंकाळी ७ वाजता हदगाव, अशा दहा ठिकाणी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या झंझावाती दौऱ्यात सभा आयोजित केल्या असून सर्व सभांना ते संबोधित करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कळविले आहे.




