spot_img
spot_img
spot_img
spot_img

शैक्षणिक उपक्रमावर जातीयवादाची काळी छाया : स्कॉलरशिप परीक्षेत विचारला वर्णव्यस्थेचे समर्थन करणारा प्रश्न.

शैक्षणिक उपक्रमावर जातीयवादाची काळी छाया : स्कॉलरशिपसाठीच्या तयारीपरीक्षेत विचारला वर्णव्यस्थेचे समर्थन करणारा प्रश्न.

यवतमाळ : इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेत मदत व्हावी आणि त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून एक उपक्रम सुरू करण्यात आला होता. या परीक्षेची जबाबदारी Target Peack या संस्थेला देण्यात आली होती.परंतु या उपक्रमाचे उद्दिष्ट आणि विश्वास दोन्ही धुळीस मिळवत, इयत्ता आठवीच्या प्रश्नपत्रिकेत “उच्च जातीचे नाव काय?” असा धक्कादायक प्रश्न विचारण्यात आला आहे.

प्रश्नासाठी दिलेले पर्यायी उत्तरे :
A) ब्राह्मण
B) क्षत्रीय
C) शूद्र
D) वैश्य

शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर जातश्रेष्ठतेची भावना बिंबवणारा हा प्रश्न विचारल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात जातीयवादाची काळी छाया पडलीय का, असा सवाल उपस्थित होत आहे.राज्यघटना समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित असून शैक्षणिक क्षेत्रातून जातव्यवस्थेचा नायनाट व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असताना, वर्णव्यवस्थेला थेट मान्यता देणारा असा प्रश्न विचारला जाणे अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे.

शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा असताना, प्रश्नपत्रिकेतून जात-श्रेष्ठतेचे घाणेरडे बीज पेरले जाणे ही केवळ चूक नाही, तर समाजाला परत जातव्यवस्थेकडे ढकलण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Epaper Website

Related Articles

प्रभादेवीत जातीय द्वेषातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

प्रभादेवीत जातीय द्वेषातून १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या वंचित बहुजन आघाडीच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर २४ तासांत आरोपी गजाआड मुंबई | प्रतिनिधी प्रभादेवी परिसरात जातीय मानसिकतेतून एका १९ वर्षीय...

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी वादळ : गिरीश महाजनांच्या भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख नाही; महिला अधिकाऱ्याचा थेट सवाल, व्हिडिओ व्हायरल

प्रतिनिधी | नाशिक नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या भाषणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!