संविधान दिनाच्या निमित्ताने औरंगाबाद छत्रपती संभाजी नगरातील प्रख्यात हायकोर्ट वकील ॲड. बाबा सरदार यांच्या कल्पनेतून आणि स्वयंप्रेरणेने “भारतीय राज्यघटना संवर्धन सभा” या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आली.
आज लोकशाहीच्या आडून लोकशाही व संविधान संपवण्याचा जो कट प्रस्थापितांनी आखलेला आहे किंबहुना लोकशाही संपुष्टात आल्याचे चित्र समोर दिसत आहे, संविधान व लोकशाही मूल्य पायदळी तुळविण्याचे कार्य आजचे सत्ताधारी व प्रस्थापितांच्या माध्यमातून सातत्याने होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने संविधानाचा जागा नव्हे तर संविधानाचे संवर्धन होणे अगत्याचे आहे, करिता ॲड. बाबा सरदार यांनी “भारतीय राज्यघटना संवर्धन सभा” या संघटनेचे स्थापना आज सावित्रीबाई फुले महाविद्यालय पडेगाव येथे केली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. शिलवंत गोपनारायण, प्रा. गौतम साळवे, डॉ. विनय हातोले, अमोल सरदार, राजू कीर्तने, महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजली मोटे, डॉ. राजू वानखेडे, राम जाधव, पवन जाधव, रवी इंगळे, प्रमोद धुळे, गौतम अमृतफळे आदी मान्यवर व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



