संविधानातील मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प: अंकुशराव टोपे महाविद्यालयात संविधान दिन समारंभ.
(जालना ): अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथे आज, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘संविधान दिन’ अत्यंत उत्साहात आणि सन्मानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या (Preamble) सामूहिक वाचनाने झाली.
प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संविधानातील सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांवर जोर दिला. त्यांनी सर्वांना संवैधानिक जबाबदारी निभावण्याचे आवाहन केले.
उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. पांडुरंग खोजे, डॉ. पंडित रानमाळ, डॉ. रामनाथ सांगुळे, डॉ. संतोष करवंदे, प्रा. रामप्रसाद भालेकर, सुरेश चव्हाण, यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाने (NSS) या कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. अन्सारी मसूद यांनी सूत्रसंचालनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडले.
सामूहिक वाचन आणि मार्गदर्शनानंतर, सर्व उपस्थितांनी संविधानाची प्रतिष्ठा राखण्याचा आणि त्यातील मूल्यांचे पालन करण्याचा दृढ संकल्प केला.



