छ. संभाजीनगर/ प्रतिनिधी दि. १ महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड . श्री सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष सचिव ॲड. श्री.यशवंत खराडे,श्री ॲड. सचिव श्री ॲड. प्रवीण नलावडे यांनी ॲड. आशा गोरे शिरसाठ यांची महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन च्या मराठवाड़ा (महीला) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याप्रसंगी ॲड.नितेश ललवाणी, ॲड. ठाकरे, ॲड. चंद्रकांत गोरे, तसेच सर्व डिस्ट्रिक्ट अँड हायकोर्ट लॉयर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
याप्रसंगी पुणे (पिंपरी चिंचवड)येथे होऊ घातलेल्या ५व्या वार्षिक नोटरी अधिवेशनात सर्व वकील वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नोटरी असोसिएशनच्या मराठवाडा अध्यक्ष ॲड. आशा गोरे यांनी केले आहे.