मुंबई मनपा निवडणुकीत मराठी समाजाची हीच शेवटची संधी: राज ठाकरे
इशारा स्पष्ट—“रात्र वैऱ्याची… सावध राहा, नाहीतर निवडणूक हातातून निसटेल”
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मतदार आणि कार्यकर्त्यांना जोरदार इशारा दिला आहे. “ही निवडणूक म्हणजे मराठी माणसासाठी शेवटची संधी आहे. थोडीशीही निष्काळजीपणा चालणार नाही. रात्र वैऱ्याची असते… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले.
राज ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईच्या स्वाभिमानासाठी, स्थानिकांच्या हक्कांसाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. “दरवेळी निवडणूक जिंकल्या नंतर बाहेरून आलेल्या गटांची सत्ता वाढते आणि मराठी माणूस शेवटच्या रांगेत ढकलला जातो. आता हे थांबवायचे असेल तर प्रत्येक मत जागरूकतेने वापरले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
- आगामी दिवसांत मनसे आपला प्रचार आक्रमकपणे राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. “लक्ष विचलित करू नका. शेवटपर्यंत लढा, अन्यथा पश्चात्ताप करावा लागेल,” असा पुन्हा एकदा इशारा देत त्यांनी मराठी मतदारांना सक्रिय सहभागाची हाक दिली



