संजय बगाटे प्रतिनिधी,/परभणी येथील न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी विजयाबाई सूर्यवंशी यांच्या वतीने दाखल आपल्यावर उच्च न्यायालयाने सबंधित पोलिसांवर एका आठवाड्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांना दिले होते. या निर्णया विरुद्ध सर्वोच्य न्यायालयात महाराष्ट सरकारने अपील दाखल केली होती. ती अपील फेटाळून सर्वोच्य न्यायालयाने आज ३० जुलै रोजी उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निर्णयाचे संविधान प्रेमी जनतेने व परभणी येथील फुले शाहू आंबेडकरी वकील संघाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून स्वागत केले.
या वेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी व भाऊ देखील सहभागी झाले होते.
प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या की, सरकारवर आमचा विश्वास राहिला नाही. सरकारनेच माझ्या मुलाची मारहान करून खून केला. आमचा विश्वास भारतीय संविधानावर आणि संविधानाने चालणाऱ्या न्यायालयावर आहे. न्यायालयच आमचे माय बाप असून भाऊ म्हणून ॲड प्रकाश आंबेडकर हे आमच्या पाठीशी उभे आहेत.
माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि ती मिळेल हा माझा न्यायलावरचा विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.
आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत व घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी वकील संघातील ॲड रवी गायकवाड, ॲड एन व्ही पिंपळगावकर,ॲड साबळे,ॲड यशवंत कसबे,ॲड विनोद अंभोरे,ॲड सुभाष गोरे,ॲड सी बी जोंधळे,ॲड आर आर जोंधळे, ॲड धनराज सोनकांबळे, ॲड विजय काळे, ॲड व्हि एस अंभोरे, ॲड महेंद्र गायकवाड, ॲड गौतम टोंपे,ॲड संदीप पठारे सह वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष सुनिता साळवे,युवक जिल्हाध्यक्ष गणेश गाढे,शहर युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद कुटे,रणजीत मकरंद ,संदीप खाडे धम्मदीप मोगले, लखन सौंदरमल, युसुफ कलीम, अशोक कांबळे व पदाधिकारी कार्यकर्ते संविधान प्रेमी जनता उपस्थित होती.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूस जबाबदार पोलिसांवर तत्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंड पीठाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल पुढील काय कार्यवाही होईल हे महत्वाचे आहे. पोलिस प्रशासनाने विलंब न लावता संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करून आम्हाला न्याय द्यावा असे विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.