करमाड :राजीव गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करमाड येथे राज्यशास्त्र व एन एस एस विभागाअंतर्गत संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब घेणार यांची प्रमुख उपस्थिती होती.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे हे होते.
या कार्यक्रमात बोलताना डॉ. बाळासाहेब लिहिणार म्हणाले संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावर लिखित घटना तयार करणे ही मोठी जबाबदारी होती. मसुदा समितीचे सात प्रमुख सदस्य होते त्यातील कोणी आजारी कोणी परदेशी तर तर कोणाचा मृत्यू झाला असल्यामुळे ती जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना एकट्यांनाच पार पाडावी लागली. विविध भाषा, विविध प्रांत, विविध संस्कृती आणि विविध धर्म यांची सांगड घालून घटना तयार करणे हे अत्यंत किचकट असलेले काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्म सम भाव या हेतूतून पार पाडले.
अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे म्हणाले एकता, समानता, आणि धर्मनिरपेक्षता ही उद्दिष्टे समोर ठेवून बाबासाहेबानी या देशाचे संविधान तयार केले. सामान्य माणसापासून ते उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींना संविधानामुळे समान हक्क प्राप्त झाला असे डॉ. मुळे सर म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश कचरे यांनी केले तर संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन व आभार प्रा. प्रशांत माठे यांनी मानले. यावेळी डॉ. कालिदास फड डॉ. नरेश डहाळे डॉ. लक्ष्मण दांडगे, प्रसन्न वैद्य, भगवंत देशपांडे डॉ. सुखदेव पोटदुखे डॉ. नानासाहेब लावंड डॉ. ललित गोल्डे,डॉ. नितीन मुळे, डॉ. इम्रान पठाण प्रा. लक्ष्मण खरात प्रा.योगेश शिंदे प्रा. तन्मय भावसार, अविनाश साळवे, शिवकुमार मुक्तापुरे प्रा. हरिदास होळकर मधुकर राठोड, ज्ञानेश्वर जाधव, कैलास जाधव, व इतर सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.



