मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल मध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा.
बुधवार, दिनांक २६ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई चे छत्रपती संभाजी नगर स्थित मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे भारतीय संविधान दिन अतिशय उत्साह साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रशालेचे मुख्याध्यापक श्री धन्यकुमार टिळक यांच्या हस्ते भारतीय संविधान उद्देशिका प्रतिमा आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या अभिवादन प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री . धन्यकुमार टिळक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाला लाभलेले अनमोल योगदान स्पष्ट केले. तसेच बाबासाहेबांनी देशाला समर्पित केलेल्या संविधानाचा उल्लेख करताना संवैधानिक नैतिकता ही महत्त्वाची आहे असे सांगितले आणि आम्ही भारताचे लोक असे म्हणत असताना देशाची लोकशाही टिकवून ठेवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती रोहिणी राजभोज यांनी केले. श्री. हेमंत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करून , श्री. भिमराव गायकवाड आणि श्री. गोविंद कांबळे यांनी संविधान गौरव गीते सादर केली. परिसरात विद्यार्थ्यांची संविधान गौरव रॅलीही काढण्यात आली. मिलिंद मराठी पूर्व प्राथमिक , मिलिंद इंग्लिश प्रायमरी स्कूल आणि मिलिंद हाय स्कूल मधील विद्यार्थी प्रियल शृंगारे , अनुष्का मोरे , सम्यक रामटेके, प्रेरणा वाकळे, रचना ईनकर,दृष्टी जाधव , सुबोध जाधव , आश्विन जाधव , हर्षवर्धन गायकवाड , वेदिका वंजारे , स्वराज जोंधळे , रोहन गायकवाड , आरोही सोनवणे , श्रेया काकडे , जान्हवी गवई या सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे , गीते व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन शरयू भद्रे हिने तर आभार प्रदर्शन प्रेरणा लोखंडे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. रामदास मारग , श्रीमती लता श्रीनाथे, श्री. योगेश पवार , श्री. विवेक पवार, श्रीमती माधुरी लिंगायत , श्रीमती माया गवई तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. भैय्यासाहेब आमराव , शिल्पा तुपे , श्री. माणिक अहिरे यांनी परिश्रम घेतले.



