spot_img
spot_img
spot_img
spot_img

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे प्रस्थापित साहित्याविरोधात बंड: प्रा.डाॕ.बाळासाहेब लिहिणार


करमाड येथील राजीव गांधी कला आणि वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वांतत्रयसेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र व एन.एस.एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.एस.मुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ.बाळासाहेब लिहिणार यांची उपस्थिती होती.डॉ. बाळासाहेब लिहिणार यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व सामाजिक कार्याचा मागोवा घेतला त्या वेळी ते म्हणाले अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून पहिल्यांदा स्त्री नायिका म्हणून अस्तित्वात आली, भारतीय साहित्याने स्त्रीला कधीच नायिका न करता तिला गरज म्हणून साहित्य कृतितील स्त्रीपात्र दर्शवीत होते अण्णा भाऊ साठे याला छेद दिला आणि साहित्य कृतितील नायिका स्त्री असू शकते हे दाखवून दिले. अण्णाभाऊची नायिका केवळ नायिका म्हणून उभी राहत नाही तर ती बंड करते, अन्याय अत्याचाराच्या हातात सुरा, तलवार, कुऱ्हाड, भाला घेऊन पेटून उठते. अण्णाभाऊनी त्यांच्या साहित्यातून दलित, शोषित, उपेक्षित, पीडित घटकाना नायक ठरविते. आजच्या तरुण पिढीला अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य प्रेरणादाई ठरते असा संदेश त्यांनी दिला. प्राचार्य डॉ.एस.एस.मुळे यांनी अध्यक्ष समारोप करताना विद्यार्थांनी अण्णाभाऊ साठे यांचा संघर्ष लक्षात घेऊन वाटचाल करावी असा संदेश दिला. याप्रसंगी प्रा.मनोज देवकर यांनी देखील अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर व विविध चळवळींवर प्रकाश टाकला. या प्रसंगी सुरुवातीला प्रस्ताविकामध्ये डाॕ.कालिदास फड यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करुन आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले कि आज प्रत्येक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करावे असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी आय.क्यु.एस.सी समन्वयक डाॕ.नरेश डहाळे यांची प्रमुख ऊपस्थिती होती. महाविद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डाॕ.किशोर काळे आणि आभार डॉ.रमेश कचरे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांचे परिश्रम मिळाले.

Epaper Website

Related Articles

वामनदादा कर्डक: गीतांचा समाजक्रांतिकारक

लोकशाहीर वामनदादा कर्डक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी नाव आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे काव्य, गीत आणि समाजसुधारणेचा अखंड संग्राम. त्यांनी आपल्या...

स्वातंत्र्याचं स्वप्न.

स्वातंत्र्याचं स्वप्न होते उदात्त घडविले त्यासाठी संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशास मिळवून दिला स्वाभिमान... शिकवला त्यांनी हक्कांचा अर्थ सर्वांना दिला समान अधिकार विचारांनी पेटली त्यांनी मशाल बाबासाहेब खरे स्वातंत्र्याचे आधार... स्वातंत्र्याचा अर्थ झाला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!