शुक्रवार, दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई चे छत्रपती संभाजी नगर , नागसेनवन स्थित मिलिंद मल्टिपर्पज हायस्कूल येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. धन्यकुमार टिळक यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या अभिवादन प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. धन्यकुमार टिळक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांच्या साहित्य चळवळीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हेमंत गायकवाड यांनी केले. प्रशालेतील शिक्षिका श्रीमती रोहिणी राजभोज यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनवृत्तांत स्पष्ट केला. प्रशालेतील विद्यार्थी सुबोध जाधव, शरयू भद्रे, मिलिंद मेश्राम, हर्षवर्धन गायकवाड, सोहम कदम, करण जाधव, स्वराज जोंधळे, रोहन गायकवाड, प्रशिक वानखेडे, पुनम हातोले , प्रगती शिंदे, स्नेहल जाधव आणि आर्यन लिहिणार तसेच मिलिंद इंग्लिश प्राइमरी स्कूल मधील संघर्ष बनसोडे , प्रबुद्ध बनसोडे आणि साक्षी लिहिणार या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषण व गाण्यांमधून अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील श्री.रामदास मारग , श्रीमती लता श्रीनाथे, श्री.भीमराव गायकवाड ,श्री.आरेफ शेख , श्री. योगेश पवार , श्रीमती माधुरी लिंगायत , श्रीमती माया गवई , श्री. विवेक पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. भैय्यासाहेब आमराव , शिल्पा तुपे, श्री.माणिक अहिरे,श्री.शरद कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज गायकवाड या विद्यार्थ्याने तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ शेंडे या विद्यार्थ्यांने केले.