संभाजीनगर | शासकीय दंत महाविद्यालयाच्या वृद्धापन दिनानिमित्त २८ जून २०२५ रोजी आयोजिलेल्या कार्यक्रमात घाटी रुग्णालय व दंत महाविद्यालय परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या दर्जेदार कामांची दखल घेत कार्यकारी अभियंता अशोकराव येरेकर यांचा गौरव करण्यात आला.या गौरव समारंभात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे माननीय मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अशोकराव येरेकर यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी आमदार सतीश चव्हाण, अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे, डॉ. इंदुरकर, डॉ. प्रज्ञा वाडीकर-बनसोडे, डॉ. अशोक पाटील, अभियंता भरतकुमार कानिंदे यांच्यासह शासकीय दंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोकराव येरेकर यांनी आपल्या कार्यकाळात विविध पायाभूत सुविधा, रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था व सौंदर्यीकरण कामे वेळेत आणि उत्कृष्ट दर्जाची पूर्ण केली. त्यांच्या कामगिरीबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.