spot_img
spot_img
spot_img
spot_img

कंत्राटी कामगारांना दिलासा : किमान वेतन थेट खात्यात जमा करण्याचे आदेश – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा हस्तक्षेप*

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार किमान वेतन मिळावे, यासाठी आता निर्णायक पावले उचलली जात आहेत. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंत्राटी कामगारांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले.या महत्वपूर्ण बैठकीत महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार (दूरदृश्यप्रणालीद्वारे), सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर आणि राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले हे उपस्थित होते.महानगरपालिकेत अनेक वर्षांपासून कंत्राटदारांकडून मनमानी सुरु होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवत किमान वेतन देखील दिले जात नव्हते. यामागे काही ठेकेदारांचे राजकीय पाठबळ असल्याचे नेहमीच बोलले जात होते. मात्र आता विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी याप्रकरणात लक्ष घालून महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे.

कामगारांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करण्याच्या या आदेशामुळे पारदर्शकता येणार असून कोणत्याही प्रकारचा कपात अथवा गैरव्यवहार होण्याचा मार्ग बंद होणार आहे. किमान वेतनाची अंमलबजावणी लवकर व्हावी, अशी अपेक्षा कामगारांकडून व्यक्त केली जात आहे.कामगारांच्या संघर्षास यश येत असल्याची भावना राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून व्यक्त झाली असून, या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. आता प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.कामगारांच्या हक्कांची जपणूक आणि न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

Epaper Website

Related Articles

स्वातंत्र्याचं स्वप्न.

स्वातंत्र्याचं स्वप्न होते उदात्त घडविले त्यासाठी संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशास मिळवून दिला स्वाभिमान... शिकवला त्यांनी हक्कांचा अर्थ सर्वांना दिला समान अधिकार विचारांनी पेटली त्यांनी मशाल बाबासाहेब खरे स्वातंत्र्याचे आधार... स्वातंत्र्याचा अर्थ झाला...

ग्रंथालयातून मनःशांतीकडेः बिब्लिओथेरपीचा आधुनिक अर्थ — डॉ. सतिश दांडगे

१२ ऑगस्टचा दिवस... देशभरातला प्रत्येक ग्रंथालय, लहानसं असो की भव्य, त्या दिवशी एका वेगळ्या च उमेदीने उजळून निघालं होतं. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन' हा केवळ...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!