spot_img
spot_img
spot_img
spot_img

संजय शिरसाट विरुद्ध इम्तियाज जलील : वाद पेटण्याची शक्यता? एमआयडीसी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याचे संकेत

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी, प्रतिनिधी

खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखलफेकीचा कट उघड झाला आहे.एमआयडीसी प्लॉट प्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोप केल्यामुळे आता इम्तियाज जलील यांच्या घरावर हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून  पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.राज्यातील एमआयडीसी प्लॉट गैरव्यवहार प्रकरणाचा वाद चिघळण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर  एमआयडीसीतील भूखंड वाटपात अनियमितता आणि कथित गैरव्यवहाराचे गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहेत. हे प्रकरण गाजत असतानाच इम्तियाज जलील यांच्या घरी शेणफेकीचा कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, काही अज्ञात व्यक्ती खासदार जलील यांच्या राहत्या घरावर शेणफेक करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती गाठल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कंबर कसली. पोलिस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा प्रकार राजकीय सूडभावनेतून होऊ शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई न ठेवता बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.”
इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन मंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट आरोप केले होते. “भूखंडाचे आरक्षण काढून प्लॉट वाटप झाले, यामध्ये मंत्री शिरसाट यांची थेट संलग्नता आहे,” असा ठपका त्यांनी ठेवला होता. तसेच त्यांनी याबाबत चौकशीची मागणी केली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली होती.या पार्श्वभूमीवर, हा मुद्दा आता केवळ भूखंड वाटपापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो वैयक्तिक आणि पक्षीय शत्रुत्वाच्या पातळीवर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

*राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस*
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. “लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्याच्या घरावर चिखलफेक करणे म्हणजे नंगानाच आहे. आम्ही अशा प्रवृत्तींना भीक घालत नाही,” असे जलील  म्हणाले.दुसरीकडे, भाजप व शिंदे गटाकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे खळबळ माजली आहे.

*पोलिस प्रशासन सतर्क*
शहर पोलिस आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलील यांच्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत असून, संभाव्य आरोपींचा शोध घेण्यासाठी खबऱ्यांचे जाळे सक्रिय करण्यात आले आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे संभाजीनगरचे राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. मंत्री शिरसाट विरुद्ध खासदार जलील हे प्रकरण फक्त भूमी वाटपपुरते मर्यादित न राहता, आता घरावर चिखलफेकीपर्यंत पोहचल्याने ‘मुद्द्यावरून गुद्द्यावर’ अशी स्थिती उद्भवली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही धक्कादायक उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Epaper Website

Related Articles

वामनदादा कर्डक: गीतांचा समाजक्रांतिकारक

लोकशाहीर वामनदादा कर्डक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी नाव आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे काव्य, गीत आणि समाजसुधारणेचा अखंड संग्राम. त्यांनी आपल्या...

स्वातंत्र्याचं स्वप्न.

स्वातंत्र्याचं स्वप्न होते उदात्त घडविले त्यासाठी संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशास मिळवून दिला स्वाभिमान... शिकवला त्यांनी हक्कांचा अर्थ सर्वांना दिला समान अधिकार विचारांनी पेटली त्यांनी मशाल बाबासाहेब खरे स्वातंत्र्याचे आधार... स्वातंत्र्याचा अर्थ झाला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!