spot_img
spot_img
spot_img
spot_img

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील रिक्त पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील रिक्त पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १0 : सैनिकी मुलांचे वसतिगृह पर्वती आणि मुलींचे वसतिगृह नवी पेठ येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने विविध पदे भरण्यात येणार असून इच्छुक माजी सैनिक तसेच नागरिकांना २० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात अतिरिक्त सहायक वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका पदाच्या अनुक्रमे पुरुषांसाठी ४ व महिलांसाठी २ जागा रिक्त असून या पदाकरीता २४ हजार ८७५ रुपये, चौकीदार पदाच्या पुरुषांसाठी प्रत्येकी १ जागा रिक्त असून यापदाकरीता २० हजार ८८६ रुपये, सफाई कामगार पदाच्या अनुक्रमे पुरुष किंवा महिला ४ आणि महिलांसाठी २ जागा रिक्त असून या पदाकरीता १३ हजार ८९ रुपये, स्वयंपाकी पदाच्या महिलांसाठी अनुक्रमे १० व ७ जागा रिक्त असून या करिता १३ हजार ९२४ रुपये आणि माळी पदाच्या अनुक्रमे पुरूषांसाठी १ व महिलांसाठी १ जागा रिक्त असून १३ हजार ८९ रुपये इतके दरमहा मानधन अदा करण्यात येणार आहे.अर्ज संबंधित वसतिगृहात सादर करावयाचे असून अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल (भ्र. ध्व. क्र. ७०२०४१०९५४) तसेच वसतिगृह अधीक्षिका कांचन नवगिरे (भ्र. ध्व. क्र. ७७७६८०५८२४) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल हंगे स.दै. (नि) यांनी केले आहे.

Epaper Website

Related Articles

वामनदादा कर्डक: गीतांचा समाजक्रांतिकारक

लोकशाहीर वामनदादा कर्डक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील एक तेजस्वी नाव आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे काव्य, गीत आणि समाजसुधारणेचा अखंड संग्राम. त्यांनी आपल्या...

स्वातंत्र्याचं स्वप्न.

स्वातंत्र्याचं स्वप्न होते उदात्त घडविले त्यासाठी संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशास मिळवून दिला स्वाभिमान... शिकवला त्यांनी हक्कांचा अर्थ सर्वांना दिला समान अधिकार विचारांनी पेटली त्यांनी मशाल बाबासाहेब खरे स्वातंत्र्याचे आधार... स्वातंत्र्याचा अर्थ झाला...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!