spot_img
spot_img
spot_img
spot_img

यकृत प्रत्यारोपण केलेल्या मातेचे यशस्वी बाळंतपण – कमलनयन बजाज रुग्णालयाचे वैद्यकीय क्षेत्रातील अद्वितीय यश!

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मीळ आणि जटिल मानल्या जाणाऱ्या यशाचा एक नवा अध्याय कमलनयन बजाज रुग्णालयाने आपल्या नावावर केला आहे. यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) केलेल्या एका मातेला नुकतेच सुरक्षित सी-सेक्शनद्वारे आरोग्यदायी बाळ जन्माला घालण्यात यश आले असून, ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समर्पित प्रयत्नांमुळे यशस्वी ठरली आहे.

या ऐतिहासिक वैद्यकीय प्रवासाचे नेतृत्व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वेदत्रयी देशमुख यांनी केले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर्सच्या बहुआयामी टीमच्या सहकार्यामुळे ही जोखीमयुक्त प्रसूती यशस्वीपणे पार पडली. बाळंतपणाच्या काळात आणि त्यानंतरही आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे.या यशस्वी शस्त्रक्रियेत डॉ. निखिल पाठक आणि डॉ. गौरव रत्नपारखी यांचेही मोलाचे योगदान लाभले. प्रसूतीपूर्व नियोजन, रुग्णाच्या प्रकृतीनुसार वैद्यकीय पर्यायांची अचूक मांडणी आणि अखंड टीमवर्क यामुळे हे कठीण कार्य सहज शक्य झाले.डॉ. वेदत्रयी देशमुख म्हणाल्या, “ही फक्त वैद्यकीय यशोगाथा नाही, तर आशावाद, चिकाटी आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीचे प्रतीक आहे.”

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना कमलनयन बजाज रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॉर्ज नोएल फर्नाडिस म्हणाले, “आमचे रुग्णालय नेहमीच नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्याच्या प्रयत्नात अग्रस्थानी राहिले आहे. हा अनुभव रुग्णसेवेला एक नवे दालन खुले करणारा आहे.”

एम. एम. आर. आय. ट्रस्टच्या अंतर्गत कार्यरत असलेले कमलनयन बजाज रुग्णालय वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने उत्कृष्टतेचे नवे मापदंड प्रस्थापित करत असून, हे यश त्याच प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो.

ही प्रेरणादायी कहाणी अनेकांना नवजीवन, नवा विश्वास आणि वैद्यकीय उपचारांकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देणारी ठरते.

Epaper Website

Related Articles

राजकीय पक्षांना थेट आव्हान,जेलची भीती बाळगू नका, प्रकाश आंबेडकर

मुबई : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत...

अंजलीताई आंबेडकर यांची नांदेडमध्ये सक्षम ताटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट; “न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत आहोत” – ठाम भूमिका

नांदेड – सक्षम ताटे हत्या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले असताना, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!