दिल्ली | न्यायालय परिसरात काल मोठा गोंधळ उडाला. माजी सरन्यायाधीश भुषन गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर हा आज कर्कडूमा कोर्टात हजर झाला असता, उपस्थित वकिलांनी संतापून त्याच्यावर धाव घेतली. काही वकिलांनी त्याला चप्पलांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. राकेश किशोर या वकिलाने काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश गवई यांच्यावर सुनावणीदरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणाची सुनावणी कर्कडूमा कोर्टात चालू होती. हजर होताच वकिलांचा मोठा गट त्याच्यावर धावून गेला आणि कोर्टरूममध्येच मारहाण केली. चप्पल, फाईल्स आणि हातातील वस्तूंनी त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप,
मारहाण सुरू झाल्यानंतर कोर्ट कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून राकेश किशोरची सुटका केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले.
वकिलांचा संताप का?
वकिलांच्या मते,
“सरन्यायाधीशांसारख्या सर्वोच्च संवैधानिक पदावरील व्यक्तीचा अपमान केला तर त्यास सहन केले जाणार नाही.”या भूमिकेमुळे कोर्ट परिसरात संतापाची लाट होती.पुढील कारवाई, संबंधित वकिलावर शिस्तपालनात्मक कारवाईची शक्यता आहे. न्यायालय प्रशासनाने व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे चौकशी सुरू केली आहे.



