पुणे : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या आयोगासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहिले नसल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत हा अर्ज सादर करण्यात आला.
२०१८ च्या कोरेगाव भीमा हिंसाचाराची चौकशी सुरू असताना आयोगाने उद्धव ठाकरे यांना ठराविक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती. मात्र या नोटीसेनंतरही ते किंवा त्यांचे प्रतिनिधी सुनावणीत उपस्थित राहिले नाहीत. या गैरहजेरीकडे आयोगाच्या आदेशाला दिलेले दुर्लक्ष म्हणून पाहत प्रकाश आंबेडकर यांच्या कायदेशीर पथकाने कठोर कारवाईची मागणी केली.
आयोगाने यापूर्वी ठाकरे यांना शो-कॉज नोटीस देत, अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करण्यास सांगितले होते. आता अटक वॉरंटाच्या मागणीवर आयोग काय निर्णय घेतो, याकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळांचे लक्ष लागले आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणातील चौकशीच्या पुढील सुनावणीची तारीख लवकरच आयोगाकडून घोषित केली जाण्याची शक्यता आहे.