दिल्ली प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाने बलात्काराशी संबंधित एका महत्त्वपूर्ण प्रकरणात ठळक निर्णय देत स्पष्ट केले आहे की, दोन प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने झालेले शारीरिक संबंध नंतर नातेसंबंध तुटल्याने गुन्हेगार ठरत नाहीत.
न्यायालयाने नमूद केले की, प्रेमसंबंध तुटणे किंवा ब्रेकअप होणे याचा अर्थ असा होत नाही की त्या नात्याच्या सुरुवातीपासूनच फसवणुकीचा हेतू होता.या निर्णयासह न्यायालयाने संबंधित प्रकरणातील आरोपीविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा खटला रद्द केला.सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अशा प्रकारच्या प्रकरणांसाठी पुढील काळात महत्त्वाचा मार्गदर्शक ठरणार असल्याचे कायदेविशारदांचे मत आहे.



