छत्रपती संभाजीनगर :- केंद्राला जास्त अधिकार देऊन, राज्यांना संघराज्यातून फुटून निघू नये यासाठीची बंधने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात समाविष्ट केली त्यामुळेच आज देश अखंड,एकात्म आहे आणि प्रत्येक व्यक्ती विकासाला वाव दिल्यामुळे प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन उज्वलकुमार म्हस्के यांनी केले.जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा, चितेगाव येथे आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते.
केंद्रीय शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक विनय साबळे सर यांच्या संकल्पनेतून आयोजित या संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरभाई शेख हे होते.सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात उज्वलकुमार म्हस्के यांनी संविधान निर्मिती मागील पार्श्वभूमी,संविधानातील महत्त्वपूर्ण तरतुदी,संविधान निर्मितीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान व संविधानामुळे देशाची झालेली सर्वांगीण प्रगती या विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.या प्रसंगी शेख सहाना मॅडम,व्ही.आर.गायकवाड,एस.व्हि.पारवे,माऊली हावळे,गवळी मॅडम,कोनेरी मॅडम,खान मॅडम, फरहत जहा मॅडम,पठाण मॅडम, शेख समिना मॅडम,शेख तैय्यब भाई यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पारवे,प्रास्ताविक माऊली हावळे तर आभार प्रदर्शन विलास गायकवाड यांनी केले. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



