छत्रपती संभाजीनगर – आंबेडकरी समाजावरील अन्याय – अत्याचार व जिव्हाळ्याच्या मुलभूत प्रश्नांवर आंदोलनात्मक कृती कार्यक्रम देणेसाठी आंबेडकरवादी संघर्ष समितिची महत्वपूर्ण बैठक संतोष मोकळे यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन, सिल्लेखाना रोड, समतानगर येथे संपन्न झाली बैठकीस समितीचे अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड यांनी मार्गदर्शन केले यावेळी रामराव दाभाडे,भाई एस एस जमधडे, नानासाहेब शिंदे, विनोद कासारे, ज्ञानेश्वर खंदारे, दशरथ आडसुळ, वसंत माटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच दिनांक 01/12/2025 रोजी सोमवारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पुढील मागण्यांसंदर्भात तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती समितिचे अध्यक्ष श्रावणदादा गायकवाड यांनी दिली.
मागण्या –
१. मौजे रहाटगाव ता.पैठण येथिल गट नंबर ४० मधील वसंत माटे, रावसाहेब माटे, सुमनबाई माटे यांच्या मालकीच्या शेतजमिनिवरील सराईत गुन्हेगारांनी केलेला अनाधिकृत ताबा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २४२ प्रमाणे पोलिस बंदोबस्तात काढण्यात यावा.
२. मौजे रहाटगाव ता.पैठण येथिल गट नंबर ४० मधील शेतवस्तीवर दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार भुऱ्या इंग्लिश भोसले व 55 ते 60 इतराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा.
३. मौजे वासडी ता. कन्नड येथील गट नंबर ३७४ मधील ६ गुंठे क्षेत्रावरील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे तसेच गट नंबर 56 ते 68 पर्यन्त शेतरस्ता करण्यात यावा.
४. मौजे राजनगाव शेनपुजी ता.गगापुर येथिल दिनेश ईतळवार व त्यांच्या कुटुंबीयांवर जातीयद्वेशातून हल्ला करणारे फरार मुस्लिम गुंड यांना तत्काळ अटक करण्यात यावी.
५. धनदांडग्यांनी गिळकृत केलेल्या महार हाडोळा वर्ग 2 च्या शेतजमिनी मुळमालकास परत द्याव्या.
६. १४ एप्रिल १९९० पुर्विचे व १४ जानेवारी २०११ पर्यन्तचे गायरान जमिनिवरील अतिक्रमणे तात्काळ नियमित करण्यात यावे, तसेच शासन निर्णयानूसार ३१ डिसेंबर २०१८ पर्यन्तचे गायरान जमिनिवरील निवासी अतिक्रमण तात्काळ नियमित करण्यात यावे.
७. अँट्रेसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी
८. शासन घोषित झोपडपट्टी वासियांना पि.आर. कार्ड देण्यात यावे.
९. शासकीय योजनेअंतर्गत विविध उद्योग धंद्यासाठी तिन महिन्यांच्या आत कर्जपुरवठा करण्यात यावा.
बैठकीस किशोर गडकर, संजय जाटवे, कचरु गवळी,बाळु मगरे, सुरज पाखरे, सोमनाथ वाघमारे,सुरेश गायकवाड, मधुकर ठोंबरे, मनोज नरवडे, रमेश खरात, शिवाजी घोबळे, रविन्द्र गायकवाड,एस.डी.जाधव गंगाधर म्हस्के, अमोल घोरपडे सुधाकर साबळे, भगवान नरवडे , सुनील साळवे, प्रशांत सूर्यवंशी, विकास शेजवळ,सुमित बनसोडे, रावसाहेब माटे, अरुण किर्तिशाही, सतिश भालेराव, किरण नवतुरे जावेद शेख, अशोक नोबेल रामेश्वर ऊदे, गौतम हिवराळे, शिवाजी वाघमारे, रोहिदास गोरमे, प्रशांत सूर्यवंशी,अजय पाखरे, पुंडलिक मंडलिक, आशिष पाखरे, दिलिप बनकर, बंटी पाखरे, पृथ्वीराज ठाकुर, संदिप पेटारे, अभिषेक शिंदे, आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



