spot_img
spot_img
spot_img
spot_img

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – प्रारूप मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर खासदार डॉ. कल्याण काळे यांची तात्काळ दखल

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – प्रारूप मतदार यादीतील गंभीर त्रुटींवर खासदार डॉ. कल्याण काळे यांची तात्काळ दखल

छत्रपती संभाजीनगर │ दिनांक :26
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये आढळून आलेल्या अतिगंभीर त्रुटींविषयी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त यांना अधिकृत पत्र व ई-मेलद्वारे सविस्तर माहिती देत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.
डॉ. काळे यांनी स्पष्ट नमूद केले की— मतदार यादीतील या चुका केवळ तांत्रिक स्वरूपाच्या नसून, नागरिकांच्या मतदान हक्कावर परिणाम करणाऱ्या, निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेला तडा देणाऱ्या आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.

मुख्य निदर्शित त्रुटी —
1️⃣ मोठ्या प्रमाणावर नागरिकांची चुकीच्या प्रभागात नोंद
प्रभाग क्र. 24 मधील अंदाजे 1500–2000 मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्र. 26 मध्ये टाकण्यात आली आहेत. अशा प्रकारच्या विसंगती अनेक प्रभागांत दिसून येत असून प्रशासनाने स्वतःहून सर्व त्रुटी शोधून योग्य प्रभागात नावांची पुनःनोंदणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. काळे यांनी नमूद केले आहे.

2️⃣ मतदारांची दुबार नोंदणी
दुबार नावे मोठ्या प्रमाणावर आढळत असून, बोगस मतदानास खतपाणी घालणारी ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याने त्वरित पडताळणी व काटेकोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

3️⃣ अपूर्ण व चुकीचे पत्ते
अनेक नागरिकांचे पत्ते चुकीचे असल्याने नाव शोधणे कठीण झाले आहे. सर्व नोंदींची पुनर्पडताळणी करून योग्य दुरुस्ती करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

4️⃣ वेबसाईटवरील मतदार यादी वाचण्यायोग्य नसणे
डिजिटल स्वरूपात उपलब्ध यादी searchable नसल्याने नागरिकांना नाव शोधणे अत्यंत अवघड झाले आहे. यादी स्पष्ट, वाचण्यायोग्य स्वरूपात प्रकाशित करण्याची सूचना देण्यात आली आहे.

5️⃣ फोटोयुक्त मतदार यादीचा अभाव
महापालिका निवडणुकीसाठी फोटोसह यादी उपलब्ध करून पारदर्शकता वाढविण्याची गरज डॉ. काळे यांनी अधोरेखित केली.

6️⃣ मोबाईल-फ्रेंडली लिंकचा अभाव
नागरिकांच्या सोयीसाठी मोबाईलवर सहज शोधता येईल अशी सर्च लिंक उपलब्ध न करणे ही मोठी तांत्रिक त्रुटी असल्याचे त्यांनी नमूद केले.

7️⃣ हरकती दाखल करण्याच्या मुदतीत वाढ आवश्यक
मोठ्या प्रमाणावर असलेल्या चुका लक्षात घेता, नागरिकांना न्याय मिळण्यासाठी हरकती/दुरुस्ती दाखल करण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे.

8️⃣ प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता यादी तयार केल्याची माहिती
संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ कार्यालयात बसून यादी तयार केल्याचे गंभीर आरोप स्थानिक पातळीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. काळे यांनी चौकशी व योग्य प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डॉ. कल्याण काळे यांची प्रतिक्रिया
खासदार डॉ. काळे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया नोंदवत म्हटले —
“मतदार यादी ही नागरिकांच्या लोकशाही हक्कांची मूलभूत नोंद आहे. हजारो नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागांत टाकली जाणे, दुबार नोंद, चुकीचे पत्ते— ही साधी तांत्रिक चूक नसून मतदारांच्या हक्कांवरील अक्षम्य अन्याय आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता जपण्यासाठी प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने आणि तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.”

तातडीच्या कार्यवाहीची मागणी
डॉ. काळे यांनी प्रशासनाला पुढील उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी केली—
चुकीच्या प्रभागांतील सर्व नावे योग्य प्रभागात दुरुस्त करणे
एकत्रित आक्षेप अर्ज स्वीकारून त्वरित निर्णय देणे.
सर्व दुबार नोंदी हटविणे.
फोटोयुक्त व सर्चेबल मतदार यादी प्रसिद्ध करणे.
मुदतवाढ जाहीर करणे.
संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे.
लोकशाही प्रक्रियेच्या रक्षणासाठी ठाम भूमिका
या सर्व त्रुटींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, डॉ. काळे यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे की—
“मतदार यादीतील प्रत्येक त्रुटी दूर होईपर्यंत मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. नागरिकांचा एकही मताधिकार हिरावला जाणार नाही.”

Epaper Website

Related Articles

राजकीय पक्षांना थेट आव्हान,जेलची भीती बाळगू नका, प्रकाश आंबेडकर

मुबई : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत...

अंजलीताई आंबेडकर यांची नांदेडमध्ये सक्षम ताटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट; “न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत आहोत” – ठाम भूमिका

नांदेड – सक्षम ताटे हत्या प्रकरणाने संपूर्ण नांदेड शहर हादरले असताना, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी आज सक्षम ताटे यांच्या कुटुंबियांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!