विषमतावादी समाजरचनेस दिलेले चोख उत्तर म्हणजे संविधान – प्रा.शिवाजी वाठोरे
सिल्लोड – समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा स्वीकार करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने विषमतावादी समाजरचनेस चोख उत्तर दिले, असे प्रतिपादन प्रा. शिवाजी वाठोरे यांनी येथे केले. कै. दादासाहेब अन्वीकर स्मारक ग्रंथालयात गुरुवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रंथपाल कविता कापसे होत्या. या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
प्रारंभी मुंबई येथे झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील शहिदांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. विजय सपकाळ याची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाल्याबद्दल त्याचा पाहुण्यांचे हस्ते हृद्य सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दत्तात्रेय पालोदकर यांनी तर काकासाहेब साळवे यांनी आभार मानले. या वेळी अमोल सागरे, योगेश काटकर, आकाश तायडे, संतोष खाकरे, रोहित बावस्कर, सौरभ पांढरे, वैभव खाकरे, शिवानी बडक, रुपाली राऊत, नवनाथ दांडगे, प्रतीक गायकवाड, स. जुबेर, स. अरबाज, रोहित शिंदे, मयुर कुदळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



