सुभेदार रामजी बाबांच्या शिस्तीत ‘ बाबासाहेब ‘घडले- अतुल वैराट
- परभणी- पोखर्णी नृसिंह येथील महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी सुभेदार रामजी बाबा सकपाळ यांच्या १७७
व्या जयंतीनिमित्ताने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख वक्ते म्हणून अतुल वैराट हे उपस्थित होते तर मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत मोगलायनजी होते तर प्रमुख उपस्थिती माजी सरपंच लक्ष्मीबाई मोते यांची होती.आदर्शांचे पूजन करून पूज्य भदंत मोगलायन जी यांनी त्रिसरण पंचशील व वंदना घेतली.
यावेळी वैचारिक अभिवादन करताना वक्ते अतुल वैराट म्हणाले की, सुभेदार रामजी बाबा हे अत्यंत कडक शिस्तीतील सैन्यातुन निवृत्त झालेले मुख्याध्यापक होते.
त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते. ते शिक्षणाचे महत्त्व जाणायचे,आपल्या मुलांनी खूप शिकावे व समाजाचा उद्धार करावा ही मनोकामना बाळगून त्यांनी लहान भिवावर संस्कार रुजवण्याचे काम केले. पहाटे दोन वाजता उठून भिवाचा अभ्यास घेणे, वाचनाची गोडी निर्माण करणे, आवश्यक असणारे पुस्तके पुरवणे हा त्यांचा नित्यक्रम.
शिस्तप्रिय वडिलांचे संस्कार बाल भिवावर रुजले गेले.
भीमराव ते बाबासाहेब या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पर्व म्हणजे सुभेदार रामजी बाबा सकपाळ होत.
प्रत्येक पित्याने त्यांचा आदर्श घेऊन आपल्या मुलालाही असेच संस्कार द्यावेत हाच निश्चय याप्रसंगी करावा. असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी गावातील लहान बालकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली.यावेळी अंगणवाडी सेविका पंचशिला भदर्गे ,वर्षाताई मोते ,पुष्पाबाई भदर्गे, मिराताई भदर्गे, सुमन ताई भदर्गे ,जयश्री भदर्गे, रमाताई ,उषाबाई भदर्गे, शैलेश भदर्गे ,आकाश भदर्गे, विजय गायकवाड ,प्रल्हाद भदर्गे ,तुकाराम भदर्गे ,केशव भालेराव ,मधुकर भदर्गे ,विशाल भदर्गे ,धम्मानंद भदर्गे, धुराजी भदर्गे, संजय भदर्गे ,अमोल मोते , भालेराव उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.



