बिहार निवडणूक निकालावर प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य ; काँग्रेसने दलित आणि हिंदू मतदारांचा विश्वास गमावला
पटणा : बिहार निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि महागठबंधनाच्या रणनीतीवर कठोर टीका केली. त्यांनी म्हटले की, हे निकाल स्पष्ट दाखवतात की काँग्रेसने केवळ दलित मतदारच नाही तर हिंदू मतदारांचाही विश्वास गमावला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आठवण करून दिली की निवडणुकीपूर्वी पटणामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इशारा दिला होता की एनडीएच्या तुलनेत महागठबंधनाकडे कोणतेही मजबूत आणि विश्वासार्ह दलित नेतृत्व नाही. त्यांच्या मते,विश्वासार्ह दलित नेतृत्वाशिवाय दलित समुदायाचे समर्थन मिळणे अशक्य आहे, आणि कालचे निकाल हेच सत्य सिद्ध करतात.
काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवर टीका करत त्यांनी म्हटले की, पक्ष दलित नेत्यांसोबत प्रभावी गठजोड करण्यात अपयशी ठरला आणि हिंदू मतदारांशी आपले संबंध सुधारण्यातही अयशस्वी राहिला.
आंबेडकर यांनी आरोप केला की, “काँग्रेसचा अहंकार भाजपााला जिंकण्यात मदत करत आहे. जर काँग्रेस खरोखर भाजपाला हरवू इच्छित असेल, तर तिने ‘मोठा भाऊ’ हा गर्विष्ठ पवित्रा सोडून प्रत्यक्ष सत्ता-वाटप स्वीकारावे. सर्वसमावेशक नेतृत्वाशिवाय भाजपााला आव्हान देणे शक्य नाही.



