धम्मचक्र प्रवर्तन दिन व संविधान गौरव दिनाच्या अमृत महोत्सवाचा मोताळ्यात जल्लोष,
एकता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम ठरला अविस्मरणीय
मोताळा ता. १० नोव्हेंबर (प्रतिनिधी) :
धम्मचक्र प्रवर्तन दिन व संविधान गौरव दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त एकता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, तरोडा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात मोताळा फाटा येथे पार पडला. या सोहळ्याची शोभा वाढवली ती प्रसिद्ध गायिका व सिने अभिनेत्री दीदी अंजली भारती यांच्या प्रभावी बुद्धभीम गीत गायन व सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाने.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्वलन व त्रिशरण-पंचशील घेऊन तसेच संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा व समिती सदस्यांचा संयुक्तरीत्या सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात शहीद झालेल्या प्रतिभाताई तायडे यांच्या आईचा वीरमाता म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच मोताळा तालुक्यातील आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवणाऱ्या विविध कलावंतांच्या कुटुंबीयांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा एकता संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.
त्यानंतर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अंजली भारती यांच्या धडाकेबाज कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यांच्या बुद्धभीम गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंबेडकरवादी व संविधानवादी जनसागराने कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. महिलांची लक्षणीय उपस्थिती हा कार्यक्रमाचा खास वैशिष्ट्यपूर्ण भाग ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष मा. सुनीलभाऊ शेळके साहेब होते, तर मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सिद्धार्थ खरात साहेब प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते.
सूत्रसंचालन निलेश भाऊ वानखेडे व श्रीकृष्ण भाऊ सुरडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन एकता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सतीश भाऊ गुरचवळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण हीरोळे, समाधान गुरचवळे, डी.जे. खंडारे, प्रसाद इंगळे, शेषराव गायकवाड, भास्कर सावळे, भीमराव शिरसाठ, राजेंद्र सावळे, एम.बी. मेढे, राजू सुरळकर, प्रेमकुमार धुरंदर, रोहन इंगळे, मधुकर शिरसाठ, गौतम खंडेराव, रामराव गुरचवळे, संतोष खराटे, शांताराम मोरे, वसुदेव धुरंदर, रमेश मोरे, नितीन इंगळे, दीपक सावळे, अजय गुरचवळे, शुभम मेढे, सम्राट गुरचवळे, प्रेम खंडेराव, भूषण सरकाटे, आकाश गुरचवळे, प्रभाकर इंगळे, कैलास धुरंदर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर सुदर्शन अहिरे, शाहीर सुरळकर, शाहीर गवई, शाहीर इंगळे व कलावंत टीम यांनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या कार्यक्रमाला पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव तसेच समाजातील सर्व क्षेत्रातील आंबेडकरवादी व संविधानवादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सतीश भाऊ गुरचवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा “न भूतो न भविष्यती” रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम मोताळा तालुक्याच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. ✨



