देवदत्त फिल्म्स्, छत्रपती संभाजीनगर, दि. १२ (प्रतिनिधी) – स्वातंत्र्यदिनाचा ७८ वा वर्धापनदिन तसेच मराठवाड्यातील पहिले दिग्दर्शक डॉ. देवदत्त म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त देवदत्त फिल्म्स् आणि फ्लावर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
नक्षत्रवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात दुपारी २ वाजता होणार्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. देवदत्त म्हात्रे हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून घाटी रुग्णालयातील कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. शैलेश निकम उपस्थित राहणार आहेत.
यावेळी फ्लावर फाऊंडेशनच्या मतिमंद मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणार्या साहित्यिक डॉ. धोंडोपंत मानवतकर, समाजसेविका डॉ. प्रतिभा थोरात-मनवर, डीजी पोलीसपदकप्राप्त मच्छिंद्रनाथ जाधव, अभिनेते रमेश सोनवणे आणि कर्मचारी नेते धनंजय नारळे या मान्यवरांचा गौरवही करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. पंजाबराव मोरे, संजय राजुरकर, राजू जाधव, सुरेखा राहुल म्हात्रे, राजेंद्र भालेराव आणि तेजस्विनी तुपसागर यांनी केले आहे.