मुंबई :तीन दशकांहून अधिक काळ सामाजिक, विधायक कार्यात अग्रेसर राहणारे आणि लेखणीव्दारे वृत्तपत्रांतून समाजातील व्यथा, वेदना, समस्या आजही सातत्याने मांडत रहाणारे जेष्ठ वृतपत्र लेखक, पत्रकार,साप्ताहिक भगवे वादळचे संपादक दत्ता श्रावण खंदारे यांना यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार नामदार भरत नाना पाटील (सदस्य राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ -भारत सरकार )यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार विक्रांत दादा पाटील,जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे बापू, जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
पत्रकार दत्ता खंदारे यांनी गेल्या ३०वर्षाच्या कालावधीत विविध दैनिक, साप्ताहिक आणि मासिका मध्ये सामाजिक प्रश्न मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला.तसेच प्रसिद्ध झालेली कात्रणे संबंधित खात्याकडे पाठवून संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला. आजपर्यंत पत्रकार दत्ता खंदारे यांना पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले असून यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार (इंदौर), राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, साहित्य रत्न लोकसेवा पुरस्कार, महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार, महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार, महाराष्ट्र संपादक भूषण आणि मुबंई वृत्तपत्र लेखक संघटनेचा जागृत नागरिक आणि पत्रभूषण पुरस्कार, हिंदुस्थान ‘बुक ऑफ रेकॉर्ड’ पुरस्कार आणि नुकतेच त्यांना कार्यदर्पण पुरस्कारने ही गौरवण्यात होते.दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात भारतरत्न डॉ. बी. आर.आंबेडकर राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. . पत्रकार दत्ता खंदारे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी (दिल्ली)चा डॉ.आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप हि प्राप्त झाला असून पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार दत्ता खंदारे यांना प्राप्त झाल्याने झाल्याने समाजात विविध स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होत आहे.