भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाध्यक्ष पदी मनोज घोडके यांची फेरनिवड करण्यात आली.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ,संस्थापक व मंत्री ना.श्री.छगनरावजी भुजबळ यांच्या आदेशानुसार हि फेरनिवड करण्यात आली.ओबीसी समाजाचे संघटन वाढवणे, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा,मंडल आयोगाच्या इतर तरतुदी,शिफारसींचा पाठपुरावा,येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इत्यादी विषयांवर समता परिषदेचे कार्याध्यक्ष मा.खासदार श्री.समीरभाऊ भुजबळ हे राज्याचा दौरा करत असून संघटनात्मक बांधणी सुध्दा करत आहेत त्याचाच भाग म्हणून मागील महिन्यात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे बैठक आयोजित करून संघटनेचा आढावा घेतला व त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी मनोज घोडके यांची फेरनिवड करण्यासाठी शिफारस केली होती.
फेरनिवड झाल्यानंतर महात्मा फुले समता परिषद जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून लवकरच नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असुन त्यामध्ये शिव,शाहु,फुले,आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणाऱ्या ओबीसी समाजातील विविध जातींच्या सक्रिय जुन्या व नविन कार्यकर्ते,पदाधिकारी यांना स्थान दिले जाणार असून त्यांना तालुकाध्यक्ष,तालुका शहराध्यक्ष व इतर महत्त्वाची पदे दिली जातील व ओबीसींच्या प्रश्नांवर समता परिषद परत नव्या उत्साहात,जोमाने व ताकदीने रस्त्यावर उतरेल असे यावेळी मनोज घोडके यांनी स्पष्ट केले.