spot_img
spot_img
spot_img
spot_img

चिकलठाणा ते एपीआय कॉर्नरपर्यंत मोठी कारवाई : ६४५ अतिक्रमण हटवली, उद्या पैठण रोडवर कारवाई

  1. चिकलठाणा ते एपीआय कॉर्नरपर्यंत मोठी कारवाई : ६४५ अतिक्रमण हटवली, उद्या पैठण रोडवर कारवाई
    छत्रपती संभाजीनगर, दि. २९ जून

महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला आज मोठे यश मिळाले. प्रशासक मा. जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा गाव ते एपीआय कॉर्नर दरम्यान अतिक्रमण विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत एकूण ६४५ पक्की व कच्ची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. यात हॉटेल, लॉज, दुकाने, शेड, कंपाऊंड, ओटे, गॅरेज, वॉशिंग सेंटर, कमानी, जाहिरात फलक आदींचा समावेश होता.

ही कारवाई प्रभावी आणि संयोजित पद्धतीने पार पडली. यामध्ये महापालिकेचे ३५० अधिकारी व कर्मचारी, तसेच पोलिस विभागाचे ४०० अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

कारवाईसाठी २० जेसीबी, ५ पोकलॅन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडा वाहने, २ अग्निशमन बंब, ४ इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहने यांचा वापर करण्यात आला.

या मोहिमेवेळी नगररचना विभागाचे उपसंचालक श्री. गर्जे, यांत्रिकी विभागाचे श्री. अमोल कुलकर्णी, पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलिस आयुक्त रणजीत पाटील, अतिक्रमण उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, प्राजक्ता वंजारी, अर्चना राजपूत, रमेश मोरे, संजय सुरडकर, गिरी, समीउल्लाह, भारत बिरारे, राहुल जाधव, नईम अन्सारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

इमारत निरीक्षक कुणाल भोसले, शिवम घोडके, सागर श्रेष्ठ, तृप्ती जाधव, मजहर अली, सय्यद जमशेद, नगररचना विभागाचे सौरभ साळवे, सूरज संवडकर, राहुल आणि नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव यांनीही सहभाग नोंदवला.

दरम्यान, जालना रोडवर विनापरवानगी महाकाय होर्डिंग उभारणाऱ्या २ इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पैठण रोडवर उद्या कारवाई
महानगरपालिकेची अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरूच राहणार असून, उद्या सोमवार, दिनांक ३० जून रोजी पैठण रोडवर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी तथा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी श्री. संतोष वाहुळे यांनी दिली.

Epaper Website

Related Articles

ग्रंथालयातून मनःशांतीकडेः बिब्लिओथेरपीचा आधुनिक अर्थ — डॉ. सतिश दांडगे

१२ ऑगस्टचा दिवस... देशभरातला प्रत्येक ग्रंथालय, लहानसं असो की भव्य, त्या दिवशी एका वेगळ्या च उमेदीने उजळून निघालं होतं. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन' हा केवळ...

बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापणदिनाचे व विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

गुहागर दि. १२ (रामदास धो. गमरे) बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर या पतसंस्थेचा प्रथम वर्धापनदिन व पतसंस्थेचा विशेषांक प्रकाशन सोहळा अश्या संयुक्त...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!