spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिद्धार्थ गार्डन गेटचा भाग कोसळला; दोन मृत, दोन गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर │ प्रतिनिधी

शहरात मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ गार्डनजवळील एका जुन्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, भगतसिंग नगर परिसरात झाड उन्मळून पडल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

सिद्धार्थ गार्डनच्या समोर असलेल्या एका जुन्या इमारतीचा प्रवेशद्वाराजवळील भाग अचानक कोसळला. यावेळी तिथे उभ्या असलेल्या ३७ वर्षीय स्वाती खैरनाथ आणि ६० वर्षीय रेखा गायकवाड या दोघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याशिवाय चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी शेख अखिल यांच्या स्थिती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.दुर्घटनेच्या वेळी शहरात मुसळधार पाऊस आणि झंझावाती वाऱ्याचा जोर होता. याच वाऱ्यामुळे भगतसिंग नगर परिसरात एक झाड उन्मळून पडले आणि त्याखाली येऊन एक महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर महानगरपालिका आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आयुक्त जी. श्रीकांत यांनी दोषी ठेकेदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून, इमारतीच्या सुरक्षिततेसंदर्भात तातडीने तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

    1. दरम्यान, जिल्हा पालक मंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केले आहे. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी सिद्धार्थ गार्डन आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

शहरात याआधी देखील वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना घडल्याचे निदर्शनास आले असून, नागरिकांनी सतर्क राहावे आणि जुन्या व धोकादायक इमारतींपासून अंतर ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Epaper Website

Related Articles

ग्रंथालयातून मनःशांतीकडेः बिब्लिओथेरपीचा आधुनिक अर्थ — डॉ. सतिश दांडगे

१२ ऑगस्टचा दिवस... देशभरातला प्रत्येक ग्रंथालय, लहानसं असो की भव्य, त्या दिवशी एका वेगळ्या च उमेदीने उजळून निघालं होतं. राष्ट्रीय ग्रंथपाल दिन' हा केवळ...

बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापणदिनाचे व विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

गुहागर दि. १२ (रामदास धो. गमरे) बौद्धजन मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गुहागर या पतसंस्थेचा प्रथम वर्धापनदिन व पतसंस्थेचा विशेषांक प्रकाशन सोहळा अश्या संयुक्त...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!