वैजापूर | प्रतिनिधी
परम पूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ अर्थात भारतीय बौद्ध महासभा ही तमाम बौद्ध बांधवांची धार्मिक मातृसंस्था आहे. याच महासभेच्या वैजापूर तालुका शाखेची नवी कार्यकारिणी नुकतीच ६ जून २०२५ रोजी, शुक्रवारच्या दिवशी जेतवन बुद्ध विहार, वैजापूर येथे पार पडलेल्या विशेष बैठकीत घोषित करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया महासभेचे ट्रस्टी सदस्य आयु. बडगे गुरुजी, राज्य संघटक आयु. किशोर जोहरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली व औरंगाबाद (पश्चिम) जिल्हाध्यक्ष आयु. सुनील वंजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष – आयु. शंकर रंभाजी पठारे
उपाध्यक्ष (संरक्षण विभाग) – जगदीश रमेश त्रिभुवन
सरचिटणीस – सोन्याबापू रामभाऊ येवले
सचिव (संरक्षण विभाग) – आयु. योगेश अरुण साळवे
सचिव (संस्कार विभाग) – आयु. यशवंत दगडुजी पडवळ
कोषाध्यक्ष – आयु. लक्ष्मण सटवाजी धनेश्वर
संघटक – आयु. बापू सोपानराव बागुल
संघटक – आयुष्यमती नंदाताई अरुण गायकवाड
संघटक – विकास भगवान त्रिभुवन
सदस्य – आयु. गोविंद महादू पगारे
तसेच वैजापूर शहर अध्यक्ष म्हणून आयु. नामदेव अर्जुन त्रिभुवन यांची निवड करण्यात आली.
ही निवड प्रक्रिया केंद्रीय शिक्षक आयु. नागेश झोडपे गुरुजी, जिल्हा सचिव आयु. मिलिंद खंडेराव यांच्या देखरेखीखाली पार पडली. त्यांना जिल्हा संघटक आयु. दादाराव त्रिभुवन, आयु. मनोहर पगारे, आयु. नवनाथ आढाव यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये आयु. राजेंद्र शिनगारे, आयु. लहाणू (काशीनाथ) शिनगारे, आयु. रावसाहेब पठारे, आयु. प्रेम गायकवाड, आयु. भीमराव त्रिभुवन, आयु. बाबासाहेब पगारे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नविन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले व सरणंतय गाथा घेऊन बैठकीचा समारोप करण्यात आला