spot_img
spot_img
spot_img
spot_img

अनु जाती उपवर्गीकरण हा सरकारचा समाजात विष पेरण्याचा प्रयत्न, ॲड.अमन आंबेडकर यांचा हल्लाबोल

अनु जाती उपवर्गीकरण हा सरकारचा समाजात विष पेरण्याचा प्रयत्न, ॲड.अमन आंबेडकर यांचा हल्लाबोल

वसमत l प्रतिनिधी

वसमत तालुक्यातील हट्टा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साडेसात फुटांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु ॲड.अमन आंनदराज आंबेडकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसमत विधानसभेचे आमदार राजुभैय्या नवघरे हे उपस्थित होते. तसेच खुरगाव प्रशिक्षण केंद्राचे संचालक भंन्ते पय्याबोधी यांनी उपस्थित उपासकांना त्रिशरण पंचशील देऊन बौद्ध धम्मदेशना दिली.
दि. २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हट्टा बसस्थानक ते बौद्धवाडा दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे हट्टा येथे आगमन होताच भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते व मान्यवर सहभागी झाले होते.
यानंतर झालेल्या जाहीर सभेत मार्गदर्शन करताना ॲड .अमन आंबेडकर यांनी “अनु जाती उपवर्गीकरण म्हणजे समाजात विष पेरण्याचा प्रयत्न असून सरकारचा जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा डाव समाजाने हाणून पाडला पाहिजे,” असे बौद्ध समाजाला आवाहन केले.
यावेळी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी,रिपब्लिकन सेना युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, महाराष्ट्र रिपब्लिकन सेनेचे नेते भैय्यासाहेब भालेराव, वसमत न.पा नगरसेवक राजकुमार एंगडे, विजयकुमार एंगडे, राजु इंगोले, महेंद्र साणके, कचरु गोडबोले, प्रदीप वाव्हळे, सचिन खाडे, संदीप खाडे, सुभाष जोंधळे, अनिल शिरसे, प्रशांत गोडबोले, प्रा. बाळासाहेब पाईकराव, सचिन पाचपुंजे, विश्वजित वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पंडित यांनी केले, प्रास्ताविक नागेश खाडे यांनी केले तर आभार आयोजक अरविंद खाडे यांनी मानले.

Epaper Website

Related Articles

बौद्ध समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; विलास काकडेविरुद्ध गुन्हा, आरोपी फरार

छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मे (प्रतिनिधी) बौद्ध समाजातील तरुणी, महिला तसेच आया-बहिणींविषयी सोशल मीडियावर अत्यंत गलिच्छ, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या विलास...

रमाबाई ची ‘ रमाई ‘ होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग.

रमाबाई ची ' रमाई ' होण्याचा हृदयस्पर्शी प्रसंग. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत दिनांक ४ एप्रिल १९०६ रोजी रमाबाई यांचा विवाह झाला . विवाहाच्या आधी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!